सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे ) दिनांक : २१ मे २०२३ : गोंदिया पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारीत अश्लेले सडक अर्जुनी तालुक्यातील डूग्गीपार पोलीस स्टेशन च्या हद्दीत चोरीचे प्रमाण सध्या वाढल्याचे चित्र आहे. मोबाईल चोरी, मोटार सायकल वाहन चोरी, शेती मध्ये वापरण्यात येणारे मोटार पंप सह अनेक चीरीचे प्रमाण वाढले आहे.
दि. १६ मे च्या रात्रीला सौन्दड येथील रहिवासी मनीष कन्हैयालाल लोहिया यांच्या घरा समोर अंगणात ठेवलेली स्कुटर गाडी चोरी झाली आहे. अंदाजे किमत ५० हजार रुपये आहे. फिर्यादी यांच्या रिर्पोटवरुन पोस्टे डुग्गीपार येथे अप क्र. १८८ / २०२३ कलम ३७९ भादवी अन्वये अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हाचा तपास पोहवा – ११९२ दामले, पोस्टे डुग्गीपार हे करीत आहेत.
तर दुसरी घटना दि. १७ मे च्या रात्रीला विनोद रामराव जगताप मु. सडक अर्जुनी, यांची आदिवासी विदयालय खजरी गेट समोर ठेवलेली मोटार सायकल चोरी झाली आहे. अंदाजे किमत ५० हजार रुपये इतकी आहे. फिर्यादीचे रिपोर्टवरून पोस्टे डुग्गीपार येथे अप क्र. १८९ / २०२३ कलम ३७९ भादवी अन्वये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हाचा तपास पो. हवा – १५२४ राउत, पोस्टे. डुग्गीपार हे करीत आहेत.
तालुक्यात वाढते चोरीचे प्रमाण पाहून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाचे तालुक्यात गस्त कमी अश्ल्याने अनेक चोरीचे प्रमाण वाढत आहेत. बाजारातुन सुद्धा मोटार सायकल आणि मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहेत. त्याच बरोबर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर अवैध रित्या चोरी छुपे डीजेल खरेदी आणि विक्री चे प्रमानात देखील वाढ झाली आहे.
हॉटेल आणि पान टपरी मध्ये देशी आणि विदेशी तसेच मोह फुलाची दारू विक्री चे प्रमाणही वाढले आहे. ग्राम राका येथे दोन लोकांचा विषारी दारू मुळे काही दिवसा पूर्वी मृत्यु झाल्याचे नागरिक चर्चे दरम्यान सांगतात. त्या मुळे पोलीस प्रशासनाने नुसते पोलीस स्टेशन मध्ये बसून खुर्च्या झिजवण्या पेक्षा जनते मध्ये जाऊन जनतेच्या समस्या आणि अवैध कारभारावर नियंत्रण करण्याची गरज आहे.
