तहसिलदार गणेश खताडे यांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर कारवाई!


सडक अर्जुनी, दी. 20 मे 2023 : सौंदड/ फुटाळा परिसरातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळाली. त्या मुळे तहसीलदार गणेश खताडे आणि त्यांची टीम 19 मे च्या रात्रीला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 वर गस्तीवर होते. महसूल विभागाने दिलेल्या माहिती नुसार 20 मे च्या पहाटे 04 वाजता अवैध रेती वाहतूक करणारे दोन वाहन पकडले. प्रत्येकी दोन्ही वाहनात दोन दोन ब्रास असा चार ब्रास वाळू असा अंदाजे 10 लाख रुपयाचा मुद्देमाल महसूल विभागाने जप्त केला आहे.

वाहन मालक गहाने तर वाहन चालक राधेश्याम चचाने वय ( 37) दोन्ही राहणार फुटाळा असे असून वाहन नंबर : एम. एच. 40 सी. डी. 8669 तर दुसरे वाहन मालक संतोष पटले सडक अर्जुनी, चालक रोहन कोकोडे वय (20) वर्ष रा. बामणी/ सडक असे असून वाहन क्रमांक : एम.एच. 35 ए. जी. 1328 असे आहे.

ही कारवाई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 वर डोंगरगाव डेपो येथे पहाटे 04 वाजता करण्यात आली. यात दोन वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. चार ब्रास रेती सह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर पथकात उपस्थित तहसीलदार गणेश खताडे, तलाठी संदीप खोडवे, तलाठी सुनील राठोड यांनी केली आहे. वाहन जप्तीच्या वेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.


 

Leave a Comment

और पढ़ें