सडक अर्जुनी, दी. 15 मे 2023 : देवपायली जवळ हायवे मार्गावर आज मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 3 लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या देवरी कोहमारा राष्ट्रीय महामार्ग क्र : 53 वर पुल नव निर्मितीचे काम गेली वर्ष भरापासून चालू आहे.
पुलाच्या कामी येणारे सिमेंट चे गर्डर वाहून नेणाऱ्या ट्रॅक ( कंटेनर ) च्या चाकात आल्याने दुचाकी वाहनावर बसलेल्या तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना डूग्गीपार पोलिस स्टेशन च्या हद्दित आज दुपारी 3 : 30 वाजता घडली आहे.
या घटनेत घटनास्थळीच तिघांच्या मृत्यू झाला. मृतक नामे : संजय इंसाराम गावडकर 35 वर्षे, पतीराम झिटू धनभाते 65 वर्षे,
रामचंद्र गावराने 60 वर्षे तिन्ही राहणार शेरपार तालुका देवरी असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तीनही मृतक मोटरसायकल क्रमांक एम. एच. 35 ए.के. 9258 ने देवरीकडे जात होते. दरम्यान ट्रॅक ला ओवटेक करताना दुचाकी चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाच्या मागील चाकात दुचाकी अडकली यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
वाहन ( कंटेनर) क्रमांक : एम. एच. 46 ए.च. 2299 असे आहे. ससिकरण पहाडी परसरतील ग्राम देवपायली जवळ हा अपघात झाला आहे. डूग्गीपार पोलिसांनी आणि महामार्ग पोलिसांनी घटनेची नोंद करून कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला आहे.