सडक अर्जुनी, दिनांक : १४ मे २०२३ : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील ग्राम पळसगाव/राका येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन राजकुमार बडोले माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते संपन्न झाले. यात जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन सिमेंट रस्त्याचे काम, सिमेंट काँक्रिट रस्ते व पांदन रस्त्यांचे कार्य करण्यात येणार आहे. यासाठी एकूण १ कोटी ४३ लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
यावेळी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असून या पुढे देखील विविध योजनेच्या माध्यमातून गावासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री बडोले यांनी ग्रामस्थांना दिले. सोबतच विविध शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना जास्तीत जास्त प्रमाणात मिळवून देण्यास मदत करण्याचे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या कविता रंगारी, पंचायत समितीचे उपसभापती शालिंदर कापगते, माजी जि. प. सभापती राजेश नंदागवळी, पं. स. सदस्या सपनाताई नाईक, संरपच भारती लोथे, उपसरपंच सुनिल चांदेवार, अशोक कापगते, ग्रामपंचायत सदस्य पुजा कापगते, कुंदा सावरकर, सविता मल्लेवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नदीवर पुल नश्ल्याने गावकर्यांना लांबून प्रवास करावा लागत आहे : सरपंच लोथे
संरपच भारती लोथे यांनी पळसगाव ते सौन्दड कडे जाणार्या मार्गाचे नवीनीकर करून देण्याची मागणी केली. तर झालेल्या भूमिपूजन कामाला निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांनी मंचावरून मान्यवरांचे आभार ही वेक्त केले. ते बोलतानी पुढे म्हणाल्या गावाचा विकास करण्याचा आपला ध्यास आहे. त्या साठी आम्हाला आपण भरभरून निधी उपलब्ध करून दिली. मात्र अजून गावातील अनेक समस्या आहेत. चुलबंद नदीच्या पुलावर नवीन पुलाची निर्मिती ची अत्यंत आवशकता आहे.
नदीवर पुल नश्ल्याने गावकर्यांना लांबून प्रवास करावा लागत आहे. त्याच बरोबर स्मश्यान भूमी मध्ये शेड ची आवशकता आहे. तर श्मश्यान भूमी कडे जाणारा मार्ग अत्यंत खराब असून त्या मार्गाने पावसाळ्यात जाता येत नाही. सौन्दड ते पळसगाव या मार्गाने रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी केली जाते त्या मुळे हा मार्ग खराब झाला आहे. यावर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करीत कामे करून देण्याचे आश्वासन दिले.
