सडक अर्जुनी, दिनांक : 11 मे 2023 : तालुक्यातील तहसीलदार गणेश खताडे हे रात्रीला स्वतः आपल्या टीम सह गस्तीवर होते. त्या मुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. तालुक्यातून सातत्याने होत असलेली रेतीची चोरी आणि नियमित वृत्त प्रकाशित होत असल्याने आता महसूल विभाग सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
10 मे रोजी च्या रात्रीला महसूल विभागाचे पथक बरोबर पोलिस विभागाचे काही लोकांनी तालुक्यात रात्री 11 वाजता पासून सकाळी 4 वाजता पर्यंत अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने गस्त केली. हे पथक ग्राम सौंदड, फुटाडा, राका, पळसगाव, भदुटोला, कोहमारा, चिखली, पीपरी या भागात फिरत होते. त्या मुळे रात्रीला या भागातून रेतीची चोरी झाली नाही हे विशेष आहे.
त्याच रात्रीला वन विभागाने 2 अवैध रेतीची वाहतूक करणारे वाहन पकडले आहे. या मुळे तालुक्यात सध्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे हे खरे.
सडक अर्जुनी तालुक्यातील तहसीलदार गणेश खताडे, सौंदड येथील बीट जमादार आनंद दामले, तलाठी बी.बी. नंदागवली, सह अन्य लोक महसूल विभागाच्या गस्तीवर होते. तर सौंदड परिसरात गस्त आल्यावर सौंदड येथील सरपंच हर्ष मोदी, ग्रा. प. सदस्य सुभम जनबंधू , नवज्योत तुमाने, ऋषभ राऊत आदी उपस्थित होते.
तालुक्यात सातत्याने महसूल विभागाची गस्त नियमित फिरत राहिल्यास अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफियांना नदीत शिरून वाळू चोरी करण्याची हिम्मत होणार नाही. हे ही त्या मागील सत्य आहे.