सडक/अर्जुनी, गोंदिया, दिनांक: ०३ : सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा तसेच लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने दि. 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या दरम्यान विद्यार्थी श्री गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवाच्या अनुषंगाने दि. 31 ऑगस्ट 2022 ला जगदीश लोहिया संस्थापक संस्थाध्यक्ष यांच्या प्रेरणेतून आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने विद्यालयात विद्यार्थी गणेश उत्सवाची सुरूवात 2022 या वर्षापासून सुरू झाली. असून यापुढे दरवर्षी विद्यार्थी गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. श्री गणेशाची स्थापना जगदीश लोहिया संस्थापक संस्थाध्यक्ष, सौ. प्रेमलता लोहिया यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने आ. न. घाटबांधे संस्था उपाध्यक्ष, पंकज लोहिया संस्था सदस्य, अनिल दीक्षित माजी पोलिस पाटील कोहमारा, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, डी. एड. एल चे विद्यार्थी प्रतिनिधी हर्षीत मांडारकर तसेच विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात गणेश उत्सव किती महत्वाचे होते. याची प्रचिती गावकरी, परिसरातील लोकांना या विद्यार्थी गणेश उत्सवाने आली.