- प्रत्येक गरजूपर्यंत शासनाच्या योजनेच्या लाभ पोहचविण्याचे कार्य करा – आ.विनोद अग्रवाल
प्रतिनिधी/गोंदिया, दिनांक : ०२ : राज्यामध्ये काही दिवसापूर्वी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जनतेचे सेवक म्हणून ओळखले जाणारे आ. विनोद अग्रवाल यांनी बरेच मागण्या केले होते. तसेच अनेक मागण्या पूर्ण सुद्धा झाले आहेत. त्यांनी बरेच अश्या मागण्या केले होते. त्यात मतदारसंघातील क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्र मध्ये याचा लाभ झाले आहे.
सर्वाना माहितच असेल आ. विनोद अग्रवाल हे नेहमीच असे प्रकरणे विधानसभा मध्ये ठेवतात ज्यांचा लाभ पूर्ण महाराष्ट्रमध्ये होत असते. त्यांनी सध्या घरांची पडझड़ झालेल्या पीडितांना ५००० ऐवजी १५००० इतकी मदद देण्यात अशी मागणी केली होती व अधिवेशनामध्येच हे मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे. तसेच त्यांनी गरजूना अन्न धान्याचा पुरवठा तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी वलित जमीनीचे शेतमालकाला २७००० प्रति हेक्टरी रूपये तसेच कोरडवाहू क्षेत्रातील शेतक-यांना १३६०० प्रति हेक्टर प्रमाणे हितासाठी त्यांनी वाढीव मदद करीता मागणी केली होती.
त्यावर ही राज्य शासनाने निर्णय घेतला आहे तसेच घरांच्या अंशत नुकसानी करीता सुद्धा वाढीव निधी मिळणार आहे. तसेच आवास योजना असो किंवा शौचालय, अन्न धान्याचा पुरवठा अश्या बरेच नागरिकांच्या समस्यांच्या निराकरण व गरजूपर्यंत योजनेचा लाभ पोहचविण्याचे कार्य करा असे ग्रामीण भागातील गुदमा, इर्री, दत्तोरा, आसोली, नवरगाँवखुर्द,नवरगाँवकला, मुंडीपार येथील कार्यकर्त्ता यांच्याशी संवाद केले आहे.
या सोबतच आ. विनोद अग्रवाल यांनी धान्य गोदाम, वाचनालय, महिला बचत गट यांच्यासाठी भवनाच्या बांधकामासाठी नियोजने सुरु आहेत व गावातील मार्गाना शहराला जोडण्यासाठी सुद्धा लवकरच अनेक मार्गाचे निर्माण होणार आहे. तसेच धानाचे प्रश्न व नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना शासनाकडून घोषित केलेली प्रोत्साहन राशी ही लवकरच शेतक-यांना मिळणार आहे व विज वितरणचे ही बरेच समस्या मार्गी लावण्यासाठी मी सतत कार्य करीत आहे व कोणतेही समस्या असल्यास माझ्याशी व माझ्या कार्यालयातील थेट संपर्क साधा असेही बोलले.