“माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ” उपक्रमाचा शुभारंभ कोकणा गावातून.


 सडक अर्जुनी,गोंदिया, दिनांक : ०३ सप्टेंबर २०२ २ : शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न प्रशासनाने समजून घेऊन व त्यावर उपाय योजना करून धोरणात्मक निर्णय घ्यावेत यासाठी दिनांक १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी यांनी संपुर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ” उपक्रमाचा शुभारंभ सडक/ अर्जुनी तालुक्यातील कोकणा/ ज. या गावातून झाला.



सदर उपक्रमाचा शुभारंभ मनोहरराव चंद्रिकापुरे आमदार अर्जुनी/मोर. विधानसभा क्षेत्र, अमरदीप रोकडे सरपंच कोकणा, शिवाजी गहाने पंचायत समिती सदस्य कोकणा, उबर हांडे विषय विशेष तज्ञ, केव्हिके, गोंदिया, कु. प्रतीक्षा मेंढे तालुका कृषी अधिकारी, सडक /अर्जुनी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रारंगणात आयोजीत कार्यक्रमात आमदार यांनी शेतकऱ्यांसोबत सामुहीकरित्या संवाद साधुन मार्गदर्शन केले तसेच अडचणी व समस्यांचे निराकरण करून शेतकऱ्यांचे पिकनिहाय समूह तयार करून गट शेती करण्याकरिता प्रोतसाहन दिले.

कु. प्रतिक्षा मेंढे तालुका कृषी अधिकारी सडक / अर्जुनी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगून पीक विमा, महाडीबीटी अंतर्गत विविध योजनांचा लाभ, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड, एकात्मिक फलोत्पादन अभियान, गोपीनाथ मुंढे शेतकरी विमा योजना, कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक – सुक्ष्म सिंचन, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ईत्यादी योजनांची माहिती देऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन खुशाल ब्राम्हणकर कृषी पर्यवेक्षक सडक / अर्जुनी यांनी केले. कार्यक्रमास मोरेश्वर राऊत उपसरपंच कोकणा, वनिता गहाने ग्रामपंचायत सदस्य, मनोज भालाधरे कृषि पर्यवेक्षक, पवार कृषी विस्तार अधिकारी सडक /अर्जुनी खोडवे तलाठी, कु. राऊत ग्रामसेवक, रजनीश मेश्राम कृषी सहायक, कोकना, खेमराज भेंडारकर, नेतराम देशमुख प्रगत शेतकरी कोकना व गावातील शेतकरी बहुसंख्यने उपस्थित होते.


 

Leave a Comment