महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शिक्षक संघ जिल्हा गोंदियाने रचला इतिहास


  • किशोर बावनकर सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांची माहिती. 

सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : ०३ सप्टेंबर २०२२ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाने आदिवासी नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना त्या भागात कार्यरत असेपर्यंत सतत एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा यासाठी लढा सुरू केला होता.
मा विरेंद्र कटरे जिल्हाध्यक्ष, मा नूतन बांगरे विभागीय अध्यक्ष, मा अनिरुद्ध मेश्राम जिल्हा सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर बावनकर सरचिटणीस सडक अर्जुनी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाकर मेश्राम, विजय डोये, योगेश्वर मुंगूलमारे, शरद साखरे, सोमेश्वर मेश्राम, सुभाष सिंदीमेश्राम यांच्या सहकार्याने एकस्तर वेतन श्रेणीचा लढा सुरू केला.



6 ऑगस्ट 2002 च्या शासन निर्णयानुसार आदिवासी व नक्षलग्रत भागात कार्यरत शिक्षकांना नक्षलग्रत भागात कार्यरत असे पर्यंत एकस्तर वेतनश्रेणी चा लाभ सतत मिळावा यासाठी संघाने वारंवार निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला. परंतु प्रशासनाने मागणी मंजूर केली नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रथमिक शिक्षक संघाने मा उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात उच्च न्यायालयाचे वकील मा प्रदीप क्षिरसागर यांच्यामार्फत रिट याचिका क्रमांक 810 दाखल केली.

नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना 12 वर्षाच्या चटोपाध्याय वेतनश्रेणी नंतर एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ बंद करण्यात येत होता. तसेच कर्मचाऱ्यांकडून एकस्तर संबंधी वसुली करण्यात येत होती. एकस्तर वेतनश्रेणी बंद केल्यामुळे आणि कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी संघाने न्यायालयीन लढा सुरू केला. मा उच्च न्यायालयाने 21 फेब्रुवारी 2022 ला दिलेल्या अंतिम निर्णयानुसार याचिकाकर्त्या शिक्षकांना नक्षलग्रस्त भागात कार्यरत असेपर्यंत एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा.



या निर्णयानुसार नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना न्याय दिला. मा उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मा अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी जि प गोंदिया व मा महेंद्र गजभिये शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) यांनी नक्षलग्रस्त भागात कर्मचारी कार्यरत असेपर्यंत एकस्तर वेतनश्रेणी सतत सुरू ठेवण्यात यावी असा पत्र काढून गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांना न्याय दिला. याबद्दल मा अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी व मा महेंद्र गजभिये शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) यांचे अभिनंदन करण्यात आले.

याकरीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदियाचे संघटक केदार गोटेफोडे, उमाशंकर पारधी, हेमंत पटले, मोरेश्वर बडवाईक, विनोद लिचडे, सुरेश रहांगडाले, यशवंत भगत, विजय गजभिये, वाय. डी. पटले, नरेंद्र आगाशे, राजु गुनेवार, गौरीशंकर खराबे, सदानंद मेंढे, शंकर चौहान, के. जी. रहांगडाले, मोरेश्वर बडवाईक, चंदू दुर्गे, रमेश संग्रामे, प्रल्हाद कापगते, अमोल खंडाईत, एन.एस. कोरे, मयूर राठोड, राजेश रामटेके, अरविंद उके, सुरेश मेश्राम, सौ. यशोधरा सोनवाने,  नितु डहाट, शिला पारधी, मनोज नेवारे, चंद्रशेखर दमाहे, पवन कोहळे, अरविंद नाकडे, भुवन औरसे गोपीनाथ ठुले, किर्तीवर्धन मेश्राम, रामेश्वर गोंनाडे, सचिन राठोड, ओ.वाय. रहांगडाले, माणिक घाटघुमर वाय. बी. कठाने रमेश बिसेन, सुरुकांत हरिनखेडे, चंद्रशेखर दमाहे, लिकेश हिरापुरे, केशवराव मानकर, वरुण दिप, आर जी. मेश्राम, गणेश चुटे, राजेंद्र निंबार्ते, सचिन वडीचार, ओमप्रकाश पटले, नरेंद्र कटरे, पठाण सर, विनोद चौधरी, के.बी. गभने, मनिष राठोड,  भाष्कर लेंडे, भाष्कर शिवणकर, लोकेश मेश्राम, मोरेश्वर लोणारे, डी आय कटरे, घनश्याम भिवगडे, जिल्हाकार्यकरिणी पदाधिकारी सर्व तालुकाध्यक्ष, तालुका सरचिटणीस,व संघाचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम केले.

6 ऑगस्ट 2002 च्या शासन निर्णयानुसार गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात कार्यरत शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ सतत सुरू ठेवण्यासाठी मा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदियाचा लढा यशस्वी झाला. याबद्दल मा मुख्य कार्यकारी अधिकारी व मा शिक्षणाधिकारी (  प्राथमिक ) यांचे समस्त शिक्षकांच्या वातीने तसेच किशोर बावनकर सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया च्या वतीने आभार वेक्त करण्यात आले.


 

Leave a Comment