सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : ०२ : सहा. जन माहिती अधिकारी पोलीस स्टेशन गोरेगाव यांनी बनावट माहिती पुरविल्याबद्दल संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत. एका अर्जदाराने लेखी स्वरूपाची तक्रार केली आहे. तक्रारकर्ता संजय रमेश बघेले रा. डव्वा पो. कारंजा, ता. गोरेगाव जि. गोंदिया, असे आहे. सविस्तर वृत्त पाहू या : तक्रारकर्त्याने संदर्भ क्र. १ अन्वये माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार जन माहिती अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव यांना दिनांक २१/६/२०२२ रोजी जोडपत्र अनुसार एकूण ०३ मुद्द्याची माहिती मागितली होती.
परंतु त्यावर संबंधित जन माहिती अधिकारी यांनी मुदतीत कोणत्याच प्रकारचे पत्र व्यवहार केले नसल्यामुळे व माहिती पुरविली नसल्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक २२/७/२०२२ रोजी प्रथम अपील दाखल केली. प्रथम अपील दाखल केल्यानंतर जन माहिती अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव यांचे पत्र दिनांक ०४/७/२०२२ रोजीचे पत्र दिनांक २५/७/२०२२ रोजी प्राप्त झाले. परंतु सदर पत्रात पुरविलेली माहिती मी मागितलेल्या जोडपत्र नुसार पुरविलेली नाही.
त्याअनुषंगाने प्रथम आपलीय अधिकारी यांनी दिनांक ०६/८/२०२२ रोजी प्रथम अपील सुनावणी घेऊन ज्याचे पत्र जा. क्र:- अपोअ/अपील क्र.३६/आदेश/२०२२-२४७२ च्या आदेशात नमूद केले की अर्जातील मागणीप्रमाणे मुद्दा क्र.१, २ व ३ ची सहा. माहिती अधिकारी तथा ठाणेदार पो.स्टे. गोरेगाव यांचेकडून प्राप्त करून अर्जदारास त्यांचे मूळ अर्जातील मागणीप्रमाणे मुद्देनिहाय माहिती पुरवावी असे आदेशीत केले.
परंतु जन माहिती अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव यांचे पत्र दिनांक १६/८/२०२२ रोजीचे पत्र मला प्राप्त दिनांक २३/८/२०२२ रोजी झाले असून सदर पुरविलेल्या माहितीचे अवलोकन केले असता पो.स्टे.गोरेगाव यांचे पत्राचे जा. क्र.१८९१/२०२२, दि.०८/८/२०२२ चे हे प्रथम अपिलीय अधिकारी यांचे दिलेल्या आदेशानंतर वेळेवर माहिती तयार करून अर्जदाराला बनावटी माहिती पुरविली आहे.
अर्जदाराने पुढे पत्रात लिहिले आहे की. माहिती अधिकार अधिनियम २००५ कायद्यात माहिती अधिकारात मागितलेली माहिती व त्यानुसार उपलब्ध असलेली माहिती पुरविणे बंधनकारक असताना देखील संबंधितांनी आपल्या बचावात सदरची माहिती ही प्रथम अपिलीय अधिकारी यांचे आदेश झाल्यानंतर तयार केल्याचे स्पष्ट निदर्शनास दिसून येते. करिता अशा माहिती तयार करणाऱ्या सहाय्यक जन माहिती अधिकारी पो.स्टे.गोरेगाव यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, तसेच त्याची नोंद त्यांच्या सेवापुस्तीकेत करण्यात यावी तसेच आपले कार्यालयाकडील केलेल्या संपूर्ण चौकशी अहवालाची प्रत नोंदणीकृत टपालाद्वारे पुरविण्यात यावी असी विनंती लेखी स्वरुपाच्या पत्रातून १) मा. अध्यक्ष, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई, २) मा. पोलिस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, गडचिरोली कॅम्प कार्यालय, नागपूर, ३) मा. पोलिस अधीक्षक, गोंदिया यांना २९/०८/२०२२ रोजी केली आहे.