अर्जुनी मोरगाव, गोंदिया, दिनांक : ०२ : शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध करण्यासाठी प्रत्यक्षात गावात जाऊन त्यांच्या अडचणी आपण समजून घेऊ पारंपारिक धान पिके वगळता फळबाग, मका, भाजीपाला व इतर नगदी पिकासाठी आपल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांची जमीन समृद्ध आहे. पीक रचनेत बदल करण्यासाठी प्रत्यक्षात गावातला जाऊन आपण शेतकऱ्याची चर्चा करू ग्रामविकास व महसूल व ईतर विभागांना सुद्धा सोबत घेऊन शेतकऱ्यांना समृद्ध करू यासाठी कृषी विभागाला योग्य आराखडा तयार करण्याचे निर्देश आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले आहे.
अर्जुनी मोरगाव येथील तालुका कृषी कार्यालयात “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” या उपक्रमांतर्गत सभेचे आयोजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार चंद्रिकापुरे म्हणाले की, आपला तालुका पाण्याने समृद्ध आहे. जमीन सुद्धा योग्य आहे. शेतकरी पारंपारिक धान पिके घेत असतो परंतु या पिकामध्ये खूप अडचणी आहेत. उन्हाळी धान पिकाच्या खरेदीसाठीखुप अडचणी आल्यात. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे अन्न पुरवठा मंत्र्याची वारंवार चर्चा करून पुन्हा धान खरेदी सुरू केली.
ज्या जमिनी धाणा शिवाय दुसरे उत्पन्न घेताच येत नाही त्या जमिनीमध्ये धान लागवड करावी. उपसा सिंचन उपलब्ध असलेल्या व कोरडवाहू जमिनीमध्ये बाजारपेठेत मागणी असलेले नगदी पिके जसे की भाजीपाला, मका, टरबूज, कारले, ऊस, ऍपल बोर, स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट औषधी वनस्पती व इतरांची ज्यामधून जास्त उत्पन्न मिळते. अशा पिकाची लागवड शेतकऱ्यांची चर्चा करून समूह शेती द्वारे मोठ्या प्रमाणात नगदी पिकाचे उत्पन्न आले. तर या पिकाच्या निर्यातीसाठी शासनाद्वारे योग्य सुविधा उपलब्ध करून देऊ त्यासाठी प्रत्यक्षात शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी एक दिवस गावात शेतकऱ्यांशी बसणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत आमूलाग्र बदल करण्यासाठी व्यापक आराखडा तयार करावा. ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पाणी वापर संस्था चे पदाधिकारी तसेच प्रगतशील शेतकरी यांना सोबत घेऊन गावाची स्थिती व त्यात योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून घेता येणारे पिके यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू मंडळ अधिकारी, कृषी सेवक, कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांत जागृती निर्माण करावी. मका पीक आता मोठे फायद्याचे ठरले ही आपली फलश्रुती आहे. तालुका कृषी अधिकारी आर.एस. लांजेवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीं आपण नेहमी तत्पर असुन एक दिवस शेतकऱ्यांसाठी नियोजन करणार असल्याचे सांगितले.
यावेळी उध्दव मेहेंदळे, आर. एस. बोरकर, एम. डी. कठाने, आर. वी. संग्रामे, व्हीं. पी. कठाने, एम. टी. येळणे. जी. एस., पुस्तोडे, कोरे, यशवंत कुंभरे, चांदेवार ,गायकवाड, झडपे, भोयर, मेश्राम, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी सेवक उपस्थीत होते.