अर्जुनी मोर, संतोष रोकडे, गोंदिया, दिनांक : २२ ऑगस्ट २०२२ : रस्त्याच्या कडेला ऊन, पाऊस सहन करत भाजीपाला, फ्रूट विक्रेता बसलेला असतो. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अर्जुनी मोरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात फुटपाथ विक्रेत्यांना मायेची सावली म्हणून छत्री भेट दिली.
आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी फळ, भाजीपाला विक्रेते यांना सध्याचे पावसाळ्याचे दिवस बघता त्यांना पावसापासून संरक्षण व्हावे व उन्हाळ्यात सुद्धा उन्हापासून संरक्षण होण्याकरता छत्री भेट म्हणून दिली. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, सौ मंजुषा चंद्रिकापुरे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, उद्धव मेहंदळे, अर्जुनी मोरगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष मंजूषा बारसागडे, नगरसेवक दानेश साखरे, सागर आरेकर, तसेच नानाजी पिंपळकर, देवानंद नंदेश्वर, योगेश कासार, वीरेंद्र बारसागडे इतर उपस्थित होते.
फुटपाथ वरच्या फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी आमदार चंद्रिकापुरे यांचे आभार मानले आम्ही सदोदित आपल्याशी सोबत आहोत अशी सुद्धा त्यांनी सद्भावना व्यक्त केली. यावेळी अलकाबाई बडोले, चरण इंदुरकर, विकास नगरकर, दिनेश शहारे, बापू सावरकर, रामकृष्ण सावरकर, चंदू शहारे, आशिष मेश्राम, चंद्रराम कावळे, डोमेश्वर देशमुख, हितेश लांजेवार, राजेंद्र शहारे, बापू लाडे, मंगल कावळे, दिवाकर शहारे, लता शहारे, अविनाश चौधरी, चौबे इतर उपस्थित होते.