गोंदिया, दिनांक : २१ ऑगस्ट २०२२ : गोंदिया भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील धान अजूनही खरेदी अभावी उघड्यावर पडलेला असून केंद्र सरकारचे चुकीच्या धोरणांमुळे मुळे रब्बी हंगामातील धान खरेदी बंद करण्यात आलेली होती. यामुळे भंडारा व गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
यासंबद्धी धान खरेदीची अडचण माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे, आमदार श्री राजुभाऊ कारेमोरे, डाँ अविनाश काशीवार यांनी खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या निदर्शनात आणून दिले. शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून राहिले, यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धान खरेदीचे उद्दिष्ट व मुदतवाढ करण्यात यावी, अशा मागणी चे निवेदन माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर व गोंदिया भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस च्या शिष्टमंडळाद्वारे मागणी करण्यात आली, रब्बी हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना या अडचणीतुन बाहेर काढून रब्बी हंगामाच्या धानाची खरेदी व्हावी, यासाठी खा. श्री प्रफुल पटेल यांनी सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे व केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला.
दरम्यान, केन्द्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने राज्यातील रब्बी हंगामातील आगाऊ धान खरेदी चे उद्दिष्ट निश्चित करून पुन्हा खरेदी सुरु करण्याचे निर्देश दिले आहे. 4.14 लाख मेट्रिक टन खरेदीचा उद्दीष्ट पूर्तीसाठी 31आगस्ट पर्यंत ची मुदतवाढ च्या सूचना निर्गमित केल्या आहे. यामुळे 31 आगस्ट पर्यंत रब्बी हंगामातील धान खरेदी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खा.श्री प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याचे फलित असल्याने शेतकऱ्यांनी खा.पटेल यांचे आभार मानले आहे.