खोडसिवणी; खजरी मार्ग प्रवासीयांसाठी ठरला डोकेदुखी!!


  • प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास… 

सडक/अर्जुनी, गोंदिया, ( बबलू मारवाडे ) दींनाक: 21 ऑगस्ट 2022 : तालुक्यात सध्या पावसाने थेमान घातले असल्याने पूर परस्थिती निर्माण झाली आहे. त्या मुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. खोडसिवणी खजरी मार्गाने नागरिक तालुक्याच्या ठिकाणी रोज आपल्या विविध कामासाठी येतात पंचायत समिती, तहसील कार्यालय, शाळा, विद्यालयात याच मार्गाने जावे लागते अश्यात या मुख्य मार्गावरील जुने पूल तोडून नवीन पुलाची निर्मितीला सुरवात झाली होती.


हे ही वाचा :  सौन्दड राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रक मध्ये धडक ! त्या अवैध पार्किंग ला जबाबदार कोण ? कायदा हातात घेऊन रात्री चाले खेळ, हा गोरख धंदा किशोर शेंडे, शिवाजी चौधरी सह ५ लोक करत अशल्याची तालुक्यात चर्चा… 



मुख्यमंत्री ग्राम सड़क योजने अंतर्गत ग्राम खजरी ते खोडशिवनी रस्त्यावर साखळी क्र.३/७०० वर लाखो रुपये मंजुर करून पुलाचे बांधकाम मंजुर करण्यात आले होते. तर या पुलाचे भूमीपूजन जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य यांच्या सुभ हस्ते संपन्न झाले होते.

यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे विधानसभा सदस्य अर्जुनी/मोर सह. परिसरातील लोक प्रतिनिधी येथे उपस्थित होते. दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी हा उद्घाटन. सोहळा संपन्न झाला होता.

गोंदिया येथील एका कंपनीला हा काम देण्यात आला होता. काम पावसाळा लागण्यापूर्वी पूर्ण होणार असे सांगण्यात आले होते. मात्र काम अद्याप पूर्ण झालेला नाही. नागरिकांना जाण्या येण्यासाठी सदर ठिकाणी कच्चा पुल तय्यार करण्यात आला होता. मात्र पुरामुळे सदर मार्ग वाहुन गेला त्या मुळे नागरिकांना खोडसिवनी ते सौंदड किवा तेली घाटबोरी या लांब मार्गाचा वापर करावा लागत आहे. हा मार्ग चालू करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत अश्ल्याने नाराजी वेक्त केली जात आहेत.



 

Leave a Comment