सौन्दड राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रक मध्ये धडक ! त्या अवैध पार्किंग ला जबाबदार कोण ?



सडक अर्जुनी, गोंदिया, ( बबलू मारवाडे ) दिनांक : २० ऑगस्ट २०२२ : तालुक्यातील ग्राम सौन्दड येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : ५३ जाते अश्यात याच ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग अशल्या मुळे मुख्य मार्गावर गेली २ वर्षे पासून पूल निर्मितीचे काम चालू आहे. पुलाचे बांधकाम आता आटोक्यात आल्यासारखे आहे. त्या मुळे रेल्वे फाटक जवळून एका बाजूने सिंगल मार्ग चालू आहे. तर त्याच मार्गाने वाहतूक देखील चालू आहे.

आज दुपारी ०१ वाजता च्या दरम्यान साकोली कडून देवरी कडे जाणारा ट्रक क्रमांक : सी. जी. ०४ जे. डी. ९५२९ हा ओवर लोड लोखंडी साहित्य घेऊन जात असताना रेल्वे क्रोसिंग जवळ समोरून येणाऱ्या बस क्रमांक : एम.एच. ४० वाय ५९८० ला बाजूने धडक दिली. ही बस देवरी कडून  साकोली कडे जात होती. ट्रक च्या बाहेर हे अवजड साहित्य निघाले होते त्या मुळे हा अपघात झाला. बस मध्ये प्रवासी बसले होते दरम्यान कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र तब्बल १५ मिनिटे या ठिकाणी ट्राफिक जाम झाली होती.

त्याला जबाबदार कोण ?

या ठिकाणी रोज रात्री १२ वाजता नंतर मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम असते. त्याला जबाबदार कोण ? हा देखील संशोधनाचा विषय आहे. पुल निर्मितीच्या ठिकाणी काही लोक अवजड वाहने लाऊन चक्क महामार्गावर अतिक्रमण केला आहे. एवढच नाही तर नव निर्मित पुलाच्या खाली देखील ही वाहने मोठ्या प्रमाणात लावली जातात. त्या मुळे समोरून येणारे वाहन काही वेळा दिसत नाही परिणामी मोठ्या अपघाताची सक्यता नाकारता येत नाही. परिणामी पुल निर्मिती करणाऱ्या कंपनी धारकानी यावर तत्काल कार्यवाई करावी असी मागणी देखील होत आहे.

 प्रती वाहन ३ हजार रुपये वसुली!

आता महामार्गावर लावलेली अवजड वाहने कोण ? आणि कश्यासाठी लावतोय हा अनेकांना प्रसन पडला असेल मात्र या थांबलेल्या ट्रक धारकांकडून चक्क वसुली केली जाते. धक्का बसला ना मंडळी मात्र हे अगदी खरे आहे. रोज रात्री लाखो रुपयाचा गल्ला या ठिकाणी होतोय. रोज रात्री मुख्य मार्ग थाबवून ही अवजड वाहने १२ वाजता पासून सकाळी ४ वाजता पर्यंत काढली जातात. त्या साठी संपूर्ण महामार्ग जाम करून ही वाहने काढली जातात.

महामार्ग जाम कश्यासाठी ? 

सौन्दड गावातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. तर जवळच लोक वस्ती देखील आहे. त्यातच रेल्वे मार्गावरून हाय होल्टेज ची विधूत तार एका विशिष्ठ उंचीवरून गेली आहे. त्या मुळे रेल्वे चालते.  या तारांना महामार्गावरून जाणारे वाहन स्पर्श होऊ नये म्हणून विशिष्ठ उंचीवर हाइट पोल ची निर्मिती करण्यात आली आहे. या उंच पोल मुळे उंच वाहने रेल्वे मार्ग ओलांडू सकत नाही. म्हणून रात्रीला सर्व खेळ चालते. उंच वाहनातील रात्रीला हवा काढून त्या वाहनाना रेल्वे क्रॉसिंग करून त्यात पुन्हा हवा भरण्यसाठी विशेष साहित्य तय्यार करण्यात आले आहेत.

प्रती वाहन ३ हजार रुपये मोजावे लागतात अन्यथा काही पर्याय नाही असे काही वाहन धारक सांगतात. हा गोरख धंदा अंदाजे गेली १० वर्षे पासून चालत आहे. आता याचा रेट कमी झाला असून पूर्वी प्रती वाहन ३० ते ४० हजार रुपये होता. त्या साठी रेल्वे मार्गावरील अश्लेले हाईट पोल अवैध रित्या काढले जायचे. या बाबद महाराष्ट्र केसरी न्यूज चे संपादक बबलू मारवाडे यांनी सदर अवैध कारभार बाबद नागपूर विभागाचे डी.आर.एम. श्री अग्रवाल यांना लेखी स्वरूपाचे निवेदन दिले होते. त्या नंतर सर्व प्रकार काही काळासाठी बंद झाला होता. मात्र पुन्हा वसुलीचा बाजार चालू झाला. विशेष म्हणजे महामार्गावरील ट्राफिक जाम करून ही वाहने काढली जातात.  त्या मुळे अन्य वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

गोंदिया पोलिसांना या बाबद माहिती आहे काय ?

अवैध कामांची माहिती पोलिसांना नाही राहत असे नाही. गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विस्वा पानसरे यांना या बाबद आम्ही एक पत्रकार परिषद दरम्यान माहिती विचारली होती. मात्र पोलिश अधीक्षकांनी तो आमचा काम नाही. ती महामार्ग पोलीसांची जबाबदार आहे. असे सांगितले होते. दरम्यान आज डोंगरगाव डेपो पोलीस कॅम्प महामार्ग पोलीस विभाग येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत भुते यांना याच विषयावर विचारणा केली असता. त्यांनी दोन्ही विभागाचे ते काम अश्ल्याचे सांगितले आहे. दरम्यान आपण कार्यवाई करणार अश्ल्याचे सांगितले.  मात्र कार्यवाई सुन्य अश्ल्याचे चित्र आहे. एकंदरीत पेकेजवर कारभार चालत असावा असी देखील परिसरात चर्चा आहे.

या प्रकरणात लोक प्रतिनिधी का गप्प ?

हे गावाला धोका अश्लेले ठिकाण असून होस्पोट ठरले आहे. जवळ लोक वस्ती अश्ल्याने येथे अपघाताचे मोठे ठिकाण आहे. जनतेसाठी धावपळ करणारे आणि जीवाची बाजी लावणारे काही कथित स्थानिक पक्षांचे लोक प्रतिनिधी यावर काहीच याक्शन घेताना दिसत नाही. आता नेमक पेकेज कुणा कुणाला जाते हा संसोधनाचा विषय ठरला आहे. अपघात झाल्यावर या ठिकाणी पोलीस वेळेवर मदतीसाठी येत नाही. मात्र या वाहन काढणाऱ्या धारकांनी फोन केल्यानंतर पोलीस विभागाची गाळी काही मिनिटात रात्रीला पोहचते हा देखील चमत्कार आहे.  विशेष सांगायचं म्हणजे हा गोरख धंदा किशोर शेंडे, शिवाजी चौधरी सह ५ लोक करतात असी चर्चा  परिसरात आहे. पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा. महाराष्ट्र केसरी न्यूज बातमीची पुष्ठी करीत नाही. मात्र यावर नियंत्रण करण्याची मागणी होत आहे.


 

Leave a Comment