देवरी, गोंदिया, दिनांक : १९ ऑगस्ट २०२२ : पंचशील चौकामध्ये भाड्याने राहणाऱ्या महिलेचा गळा चिरुन खून करण्यात आल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. असून शिशुकला साखरे (35) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. खून झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने गायब असून घरातील सामानसुद्धा अस्ताव्यस्त पसरलेले असल्याने मृतक महिलेचा लूटमार करण्यासाठी तर करण्यात आला नसावा ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे देवरी शहरात खळबळ उडाली असून पोलिस फरार आरोपीच्या शोध घेत आहे. दरम्यान देवरित पोलिसांचे श्वान पथक दाखिल झाले असून श्वान पथकाने रात्रभर अख्ख देवरी शहर पिंजुन काढले आहे.
मृतक शिशुकला साखरे या टेलरिंगचे काम करायच्या. त्यांचे पती छत्रपती शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज देवरी येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. पती ड्युटीवर गेले होते, तर दोन्ही मुले शाळेत गेली होती. सायंकाळी दोन्ही मुले घरी आली तेव्हा बाहेरुन दरवाजा लावून असलेली कुंडी खोलताच त्यांना त्यांची आई रक्तबंबाळ अवस्थेत फरशीवर पडून दिसली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बाजूचे शेजारी व नागरिक धावून आले. दरम्यान या घटनेची माहिती देवरी पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक बनकर व पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला. गोंदियावरून श्वानपथकाला पाचारण केले आहे. घटनास्थळावरील परिस्थिती आणि खून झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने गायब असल्याने आणि घरातील कपाट आणि इतर सामानसुद्धा विखुरलेल्या अवस्थेत आढळल्याने हा खून लूटमार करण्याच्या प्रकारातून तर झाला नसावा ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. देवरी पोलिस फरार आरोपी शोध घेत आहे. एकंदरीत जुन्या वयमनुश्यातून ही हत्या करण्यात आली अश्ल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.