गोंदिया, दिनांक ; १९ ऑगस्ट २०२२ : १८ रोजी दुपारी ०२ च्या सुमारास झालेल्या अपघातात. एक ठार झाला तर तीन लोक गंभीर जखमी झाले आहे. अविनाश श्रीपत लटये २५ रा. भजेपार असे मृताचे तर शुभम येवतकर २२, जयदेव येवतकर ४६, मेचनबाई महादेव येवतकर ५५ सर्व रा. भजेपार अशी जखमीची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय तिरोडा येथे तत्काळ हलविण्यात आले. जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील ग्राम भजेपार शेत शिवारात दोन दुचाकींची भरधाव वेगात धडक झाली. या घटनेत एका दुचाकी चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकी वर स्वार अश्लेले तिघे जण गंभीर जखमी झाले. दुचाकी वाहन क्र. एमएच-३५/एक्यु ८५४६ ने जात होते. तर विरूध्द दिशेने अविनाश श्रीपत लटये मृतक हा दुचाकी क्र. एमएच-३५/एसी २०४९ ने येत होता. दरम्यान दोन वाहनात धडक झाली. या घटनेत अविनाशच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तिरोडा पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.