कायदयाचे ज्ञान तुमचे रक्षण करेल – डॉ. विक्रम आव्हाड


सौंदड ;  येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा तसेच लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट 2022 ला विद्यालयात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम’ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्याचा अमृृत महोत्सवी कार्यक्रमाप्रसंंगी ध्वजारोहण लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक – संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. ध्वजारोहणानंतर संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे पूजन करून माल्यार्पण तसेेच जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळेच्या डिजिटल रूमचे उद्घाटन संस्थापक मा. जगदीश लोहिया यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

समारोपिय कार्यक्रमाप्रसंगी ध्वजारोहक संस्थापक मा. जगदीश लोहिया, कार्यक्रमाचे अध्यक्ष लो.शि.संस्थेचे माजी अध्यक्ष मा.सुभाषचंद्र अग्रवाल, प्रमुख अतिथी मा.डॉ. विक्रम आव्हाड, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी स./ अर्जुनी, अतिथी म्हणुुन तालुका वकील संघ स/ अर्जुनी चे अध्यक्ष मा.अँड. दिपक बन्सोड, संस्था उपाध्यक्ष- मा.आ.न. घाटबांधे, संस्था सदस्य मा. पंकज लोहिया, मा.प्रा.डॉ.जगदीश जनबंधू, प्राचार्य मा. अनिल मेश्राम, शा.सु.स. सदस्य मा. भजनदास बडोले व मा. शमीम अहमद, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल व गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षिका सौ. कल्पना काळे, प्राध्यापक श्री राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व ‘विरों का बलिदान’ हा देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांना जाज्वल देशभक्तीचे दर्शन घडविले. या प्रसंगी संस्थेतर्फे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सुभाषचंद्र अग्रवाल व संस्थापक मा. जगदीश लोहिया यांच्या शुभहस्ते प्रमुुख अतिथी मा. डॉ. विक्रम आव्हाड-दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी स./ अर्जुनी यांचे शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन तसेच अतिथी मा.अँड. दिपक बन्सोड- अध्यक्ष, तालुका वकील संघ, यांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

विशेष म्हणजे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन म्हणून वृक्ष लागवडीसाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या शुुभहस्ते विविध प्रकारच्या वृक्षांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषणातूून मा.सुभाषचंद्र अग्रवाल यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्व सांगूून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहक संस्थापक मा.जगदीश लोहिया यांनी “आजन्म, शिक्षणाच्या माध्यमातून गाव व परीसराच्या विकासाचे ध्येय आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सोयी-सुविधांचा लाभ घेऊन आपले जीवन व भवितव्य घडवावे” अशी ईच्छा व्यक्त करुन “विदयालयांच्या माध्यमातून जनकल्याणाची संधी मिळाली हे मी माझे सौभाग्य समजतो.

“अशी भावना व्यक्त केली. प्रमुख अतिथी मा.डॉ.विक्रम आव्हाड यांनी “विद्यार्थ्यांनो कायदा तुमच्या सोबत आहे, कायदयाचे ज्ञान तुमचे रक्षण करेल, तुम्ही डिजिटल साक्षर झालेत, आता कायदेविषयक साक्षर व्हा.” असे मार्गदर्शन करुन “कायदयात राहाल तर फायदयात राहाल” याची जाणीव करुन दिली. तसेच मा.अँड.दिपक बन्सोड, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाला संस्था तसेच शाळेच्या विविध समित्यांचे पदाधिकारी व सदस्यगण,निमंत्रित पाहुणे, पालक, गावकरी, विद्याथीॅ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे, संचालन स.शि. कू.यू.बी. डोये यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक श्री. मनोज शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदेमातरम’ गिताने करण्यात आली.


 

Leave a Comment