सडक अर्जुनी, गोंदिया, ता : 13 ऑगस्ट 2022 : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव राका शाळेने स्वच्छ विदयालय पूरस्कार उपक्रमात हिरिरीने सहभाग घेत स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व कोविड काळात उत्कृष्ट काम केल्यामुळे राज्य स्तरावर झालेल्या मूल्यांकनात राष्ट्रीय पूरस्कार मूल्यांकनासाठी पळसगाव राका शाळेची निवड करण्यात आली आहे.
मागील काही वर्षापासून जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव राका ही आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामूळे गोंदिया जिल्ह्यात चर्चेत राहिली असून ओझोन दिनानिमित्त झालेल्या राज्य स्तरीय स्पर्धेत व कोविड लसिकरणात शाळेने उत्कृष्ट काम केले आहे. आकाशवाणीने सूद्धा शाळेतील गुणवत्ता व उपक्रमाची दखल घेत शालेय विद्यार्थ्यांनीची मूलाखत घेवून शाळेचा गौरव केला आहे. केंद्र शासनाच्या वतीने आयोजित स्वच्छ विद्यालय पूरस्कारासाठी राज्यातील 70 हजार पेक्षा जास्त शाळा सहभागी झाल्यात.
गोंदिया जिल्ह्यातून जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा, पळसगाव-राका पंचायत समिती , स/अर्जुनी या शाळेने मूख्याध्यापक एस.आर. फूंडे यांच्या नेतृत्वात मूख्यकार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उपमूख्यकार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, मूलेविअ जनार्दन खोटरे, शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये, उपशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील पद्विधर शिक्षक संदिप तिडके, पद्विधर शिक्षक भास्कर नागपूरे, सहाय्यक शिक्षक नितीन अंबादे व सौ. एस.टी. कापगते मँडम यांच्या सहकार्याने उत्कृष्ट तयारी करीत राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करीत राज्यस्तरावरील पूरस्कारात 26 शाळांमध्ये पळसगांव/राका शाळेची निवड करण्यात आली असून राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकनासाठी शाळा पात्र ठरली आहे.
पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेची निवड राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ विदयालय पूरस्कार मूल्यांकनासाठी करण्यात आली आहे. शाळेला विशेष मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल गट शिक्षणाधिकारी सूभाष बागडे, केंद्र प्रमुख लांडगे, नोडल अधिकारी राऊत, सरपंच भारतीताई लोथे, उपसरपंच सूनिल चांदेवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सूभाष मानकर, उपाध्यक्ष धनराज येरपूडे यासर शाळा व्यवस्थापन पदाधिकारी, गावकरी व विद्यार्थी यांनी केले.