आश्वासन मिळाल्याने स्वातंत्र्यदिनी जलसमाधी घेण्याचा निर्णय मागे.


सौंदड, सडक अर्जुनी, गोंदिया, दी. 13 ऑगस्ट 2022 : स्वत:च्या शेतीचे गेलेल्या पाटचा-यामुळे होणारे नुकसान थांबवण्यासाठी मामा तलावाच्या पाटचा-याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी कुटूंबासह जलसमाधी घेण्याचा इशारा तालुक्यातील कोसमतोंडी येथील शेतकरी सुभाष पोलुराम काशिवार यांनी दिला होता.

त्यासंबंधी निवेदन मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना दिले होते. सदर शेतकऱ्यांचे निवेदन व पत्राची तात्काळ दखल घेऊन लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी रामटेके, राऊत, बिसेन, जि.प.सदस्या सुधा राहांगडाले, पं.स.सदस्या निशा काशिवार, कोसमतोंडी चे सरपंच महेंद्र पशिने व शितला माता पाणी वाटप संस्थेचे सदस्य गजानन काशिवार, डॉ. कमलाकर काशिवार राकेश काशिवार व नागरीक
यांनी १० आॅगस्ट रोजी सदर शेतकरी सुभाष पोलुराम काशिवार यांचे शेतात जाऊन पाटचा-यामुळे होत असलेल्या शेतीचे नुकसानीची पाहणी केली.

मार्च महिन्यापर्यंत मामा तलावाच्या पाटचा-याचे बांधकाम सिमेंट काॅक्रीटचे करण्यात येईल व पांदन रस्त्याचे खडीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यामुळे सदर शेतकऱ्यांने स्वातंत्र्यदिनी कुटूंबासह जलसमाधी घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

तसे पत्र संबंधित लघुपाटबंधारे विभाग, मुख्यमंत्री, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

सविस्तर वृत्त, सुभाष पोलुराम काशिवार यांची कोसमतोडी बेहळीटोला मार्गाशेजारी शेतजमीन आहे त्यांच्या शेतातून पूढे शेतीला ओलिताखाली आणण्यासाठी मामा तलाव गट क्र.३१४ (सोनारबोडी) चा पाट काढण्यात आला आहे. मात्र, यामुळे त्यांच्या शेतजमिनीचे व शेतपीकाचे सतत मोठे नुकसान होत आहे.

याबाबत सुभाष पोलुराम काशिवार यांनी अनेकवेळा शितला माता पाणी वाटप संस्थेला तक्रार करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती. परंतू संस्थेने‌ अद्यापही कोणतेही पाऊल उचलले नव्हते.

परिणामी या समस्येवर तातडीने तोडगा न निघाल्यास स्वातंत्र्यदिनी कुटूंबासह तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा शासन व प्रशासनाला दिला होता. मामा तलावाच्या पाटचा-याचे बांधकाम सिमेंट काॅक्रीटचे करण्यात यावे व पांदन रस्त्याचे खडीकरण करणे या मागण्या त्वरीत पूर्ण न झाल्यास जलसमाधी घेण्याचे निवेदन त्यांनी ८ आॅगस्ट रोजी जि.प. च्या लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना केली होती.

यांची त्वरीत दखल घेऊन संबंधित लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी सदर शेतकऱ्यांचे शेतीची पाहणी करून मार्च महिन्यापर्यंत मामा तलावाच्या पाटचा-याचे बांधकाम सिमेंट काॅक्रीटचे व पांदन रस्त्याचे खडीकरण करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांने स्वातंत्र्यदिनी कुटूंबासह जलसमाधी घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

निशा काशिवार, पं.स. सदस्या सडक अर्जुनी.

मामा तलाव गट क्र. 314 (सोनारबोडी) चे पाणी मालकीच्या शेतीत घुसून शेतकऱ्यांचे शेतपिकाचे दरवर्षी नुकसान होत असते. याबाबत शितला माता पाणी वाटप संस्थेला शेतकऱ्यांनी तक्रार करूनही मामा तलावाच्या पाटचा-याचे दुरुस्ती करण्यात येत नव्हती. तसेच कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतपीकात पाणी घुसून शेतीचे नुकसान होत होते. याला कंटाळून सुभाष पोलुराम काशिवार यांनी स्वातंत्र्यदिनी कुटूंबासह जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता. याबाबात शासन व प्रशासन यांना निवेदन देऊन कळविले होते. या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी रामटेके, राऊत, बिसेन यांनी मार्च महिन्यापर्यंत समस्या मार्गी लावून उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांने स्वातंत्र्यदिनी कुटूंबासह जलसमाधी घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे.


 

Leave a Comment