ग्राम पंचायत डव्वा येथे 75 वा अमृत महोत्सव साजरा!


सडक अर्जुनी, गोंदिया, दिंनाक: 13 ऑगस्ट 2022 : आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75 वा अमृत महोत्सव निमित्ताने ध्वजारोहण फडकवित अमृत महोत्सवाला सुरवात करण्यात आली. 13 ते 15 ऑगस्ट रोजी दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 75 व्या अमृत महोत्सवात संपूर्ण देशातील जनतेने सहभाग घेतल्याचे चित्र दिसत आहे.

केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत आज दिनांक 13 रोजी ग्रामपंचायत कार्यालय डव्वा येथे प.स. सदस्य चेतन भाऊ वळगाये याचे अध्यक्षतेखाली सरपंच पुष्पमाला ताई बडोले ग्रामपंचायत डव्वा यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित मा. शालिंदर कापगते उपसभापती प.स. सडक अर्जुनी, ग्रामविकास अधिकारी गणेश मुनिष्वर, सिंगनजुडे सर, राऊत सर, देशपांडे सर, लुकेश कुरसुंगे , हितेंद्र बडोले, विजुभाऊ चौधरी, छाया येल्ले, सविता प्रधान, लीला चौधरी, मीनाक्षी गाते, कैलास लाडे, पुरण चुटे, उषा बोरकर , चीत्ररेखा चौधरी , मनिषा वळगाये, संगीता कापगते, विशाखा जांभूळकर, राऊत ताई, चौधरी ताई रामलाल सयाम, बाळू कवरे, ईश्वर गाते इत्यादी तसेच गावकरी उपस्थित होते.

तसेच दिनांक 14 व 15 ला सुध्दा ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच बडोले यांनी सांगितले.


 

Leave a Comment