नांदेड, दिंनाक: 13 ऑगस्ट 2022 : नांदेड जिल्ह्यातील मुखेड ते नर्सी या महामार्गावरील अनधिकृत गतीरोधक तात्काळ काढण्यात यावे. अशी केंद्र मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्ते विलास शिंदे वसूरकर यांची पत्रातून मागणी.
सविस्तर माहिती : नांदेड जिल्ह्यातील मुखेड ते नर्सी या महामार्ग 25 कि. मी. असून या महामार्गावर जवळपास 18 गतीरोधक असून ह्या गतीरोधकामुळे कमरेचा व पाटीचा त्रास होत आहे. गतीरोधक व त्याची संख्या इतकी आहे. की त्यामुळे बराच टाईम जात आहे. गतीरोधकांची उंची 10 सें.मी. व लांबी 3.3 व त्यावर पांढरे पेंट केली पट्टी व गतीरोधक येण्या अगोधर पाटी लावणे अवश्यक आहे.
पण हे कुठेही केलेले दिसत नाही. गतीरोधक वर पांढरे पेंट केलेली पट्टी नसल्यामुळे रात्रीच्या वेळी पुढे गतीरोधक आहे. हे दिसतच नाही. त्यामुळे जिवघेणे गतीरोधक तात्काळ काढण्यात यावे. हे गतीरोधक बनवताना सर्वेक्षण करून परवानगी देण्यात आली आहे का ह्याची पण चौकशी करण्यात यावी. अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विलास शिंदे वसूरकर यांनी केली आहे.
एकंदरीत मुख्य मार्गावर लावलेले हे गतिरोधक अवैध रित्या लवल्यात आले तर नाही ना अशी देखील चर्चा आहे. रात्री गती रोधक दिसत नसल्याने दुचाकी वाहन धारक पडण्याची भीती आहे. तर भविष्यात सदर ठिकाणी अपघाती मृत्यु चे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय म्हणून ही मागणी रास्त आहे.