सडक अर्जुनी, गोंदिया, 13 ऑगस्ट 2022 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतंर्गत आदिवासी विकास हायस्कूल व कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी येथे ध्वजारोहन 15 ऑगस्ट रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर खजरी शाळेच्या वतिने आज ता.13 ऑगस्ट शनिवारी रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतंर्गत ध्वजारोहन करण्यात आले. अध्यक्ष स्थानी प्राचार्य खुशाल कटरे होते.
या प्रसंगी पोलीस पाटील तथा शाळा समीती चे सदस्य इंद्रराज बापू राऊत यांनी ध्वजारोहन केले. या प्रसंगी माजी उपसरपंच तथा वर्तमान ग्रा.प.सदस्य उमराव मांढरे, पर्यवेक्षक आर.के. कटरे, वरीष्ठ शिक्षक डी.डी. रहांगडाले, उच्च माध्यमिक विद्यालय प्रभारी वाय.टी. परशुरामकर सह सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.