सडक अर्जुनी, दींनाक: 13 ऑगस्ट 2022 : तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय बोथली येथे दीं. 12 ऑगस्ट रोजी नवीन ग्राम पांचायत कार्यालयाचे लोकार्पण तसेच सत्कार सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गंगाधर परसुरामकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
राज्यसभा सदस्य प्रफुलभाई पटेल यांच्या स्थानिक विकास योजने अंतर्गत नविन ग्रा. पं. भवनाचे लोकार्पण तसेच समोरील सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन, अंगणवाडी, जि. प. शाळा समोरील पटांगणात फेव्हर ब्लॉक कामाचे भुमिपुजन, बोथली ग्रा. पं. अंतर्गत जन सुविधा (जिल्हावार्षीक) योजना सन २०१८-१९ अंतर्गत जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या प्रयत्नांनी झालेले नविन ग्रा. पं. भवनाचे लोकार्पन सोहळा संपन्न झाले.
त्याचे औचित्य साधत ग्राम पंचायत बोथली येथील ग्राम पंचायत कार्यालयाची स्थापना 1960 मध्ये झाली होती. त्या अनुसंघने आता पर्यंत झालेल्या सर्व सरपंच महोद्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक : गंगाधर परशुरामकर माजी जि.प. सदस्य गोंदिया, कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश चौव्हाण सरपंच बोथली.
सत्कार मूर्ती : छबीलाल चौव्हाण माजी सरपंच, हिरालाल चौव्हाण माजी सरपंच, नामदेव पेटकुले माजी सरपंच, गजानन मांदाळे माजी सरपंच, मिराबाई भोयर माजी सरपंच, कृष्णा भोयर माजी सरपंच, घनश्याम चौव्हाण माजी तं.मु.स.अध्यक्ष, दिलीप कटरे आर्मी, लीकेश भागवत पारधी (आर्मी ), जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परसुरामकर यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी स्थानी अंकुश गजभिये उपसरपंच, सुभाष बागडे तंटामुक्ती अध्यक्ष, मंदाबाई लसवंते पोलीस पाटील, विनाबाई कटरे ग्रा.पं. सदस्या, दिनेश पारधी ग्रा.पं. सदस्य, छायाबाई कवरे ग्रा.पं. सदस्या, अभिमन्यु मांदाळे ग्रा.पं. सदस्य, प्रतिमाताई भोयर ग्रा.पं.सदस्या, प्रमिलाताई राऊत ग्रा.पं. सदस्या, ममताताई भोयर शा.व्य.स. अध्यक्ष, प्रदिप ठाकरे शा.व्य.स. उपाध्यक्ष, कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रास्थाविक ग्रा.प. सचिव विद्या कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन महेश कवरे सहाय्यक शिक्षक बोथली यांनी केले तर आभार अंकुश गजभिये उप सरपंच बोथली यांनी मानले.