सडक अर्जुनी, गोंदिया, दींनाक: 11 ऑगस्ट 2022 : तालुक्यात 09 आणि 10 रोजी दमदार पावसाने हजेरी लावली अश्यात अनेक नागरिकांचे घरे पडली तर जनावरांचे गोठे जमीन दोष झाले, त्याच बरोबर शेती चे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, बामनी साजा क्रमांक : 16 येथील तलाठी राजु उपरीकर यांनी तात्काळ घटना स्थळी भेट देऊन पंचनामे तय्यार केले. जवळपास 16 नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तय्यार केले असून अंदाजे 60 हजार रुपयाची नुकसान भरपाई शासनाकडून नुकसान ग्रस्थांना मिळेल अशी माहिती तलाठी राजु उपरीकर यांनी दिली.
यावेळी बामणी, डोंगरगाव, मंदिटोला, गावातील सरपंच सिंधू बारसागडे, मोहन सुरसाउत, भैय्या लाला मडावी, उपस्थित होते. पंचनामे करून तालुका तहसीलदार यांच्याकडे पाठविले आहेत. दरम्यान गावकरी हंसराज मेश्राम, महेश शेंडे, राधेश्याम शिवणकर, अनिल धूर्वे, केलास मडावी सह अन्य उपस्थित होते. तलाठ्याच्या कामाने परिसरातील नागरिक समाधान वेक्त करीत आहेत. शासनाच्या आदेशानुसार आम्ही काम करतोय नागरिकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमची धडपड चालू आहे. असे राजु उपरिकर तलाठी बामनी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.