सडक अर्जुनी, गोंदिया, दींनाक: 11 ऑगस्ट 2022 : ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने तालुका कृषि अधिकारी कार्यालय व आत्माच्या वतीने तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शनी व विक्री महोत्सवाचे आयोजन बुधवार १० ऑगस्ट २०२२ ला सकाळी ११.३० वा. तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसर सडक / अर्जुनी येथे आयोजित करण्यात आला. रानभाजी प्रदर्शनी व विक्री महोत्सवाचे उद्घाटक आमदार मनोहर चंद्रिकापुरे विधानसभा क्षेत्र अर्जुनी / मोर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे सुधाताई राहांगडाले जिल्हा परिषद सदस्य,, चंद्रकला डोंगरवार जिल्हा परिषद सदस्य, शालींदर कापगते उपसभापती पंचायत समिती सडक अर्जुनी , एफ. आर. टी. शहा शेतकरी सल्लागार समिती अध्यक्ष , तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथील सर्व अधिकारी व कर्मचारी दीपक. एच. निमकर तालुका व्सयवस्थापक ( उमेद ) उपस्थित होते.
मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतीचा समावेश असतो धान्य , कडधान्य , यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी आपल्या आहारात भाजी म्हणून खोड , पाने , फळे , बिया , कंद , मुळे , फुले यांचा वापर केला जातो. पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती खाण्याजोग्या असतात . सद्यस्थितीत धकाधकीच्या जीवनामध्ये रानातील , शेतशिवारातील उगवल्या जाणाऱ्या भाज्याचे महत्त्व व आरोग्य विषयक माहिती सर्वसाधारण नागरिकांना होणाऱ्या दृष्टीने रानभाज्या ओळख आणि त्याचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होणाकरिता तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शनी व विक्री महोत्सवात तालुक्यातील बहुतांश महिला गटांनी रानभाजी विक्री करिता आणली सदर महोत्सव विविध प्रकारचे रानभाजी तरोटा , कुडा , पाथरी , शेवगा , अळू , केना , बांबू खापारखुटी , घोडभाजी , आंबाडी , सुरण , भुइनिब , इतर रानभाजी विक्री करण्यात आली.
तालुक्यात सदर महोत्सवाला भरपूर प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे संचालन कु. आर. जे. कहालकर बिटीएम व आभार खुशाल ब्राम्हणकर कृषी परिवेक्षक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका कृषी अधिकारी पी. आर. मेंढे , कृषि परिवेक्षक एस. एफ. वाघाये, एम. एम. भालाधारे , कृषि सहयक एस. आर. कुंभलवार, आर . एच. मेश्राम, ए.जे. गहाने, व्ही . एम . बिसेन, आर. बी. अंबुले, गुलचंद्र मस्के, सह्यक तंत्राझान व्यवस्थापक , सुहास परशुरामकर , लीभास गराडे , दयानंद फुलझाडे , कोमल चांदेवर व निशा कोरे , पराग नंदेश्वर यांनी प्रयत्न केले.