अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे तयार करा ; आमदार मनोहर चंद्रिकापुरे


सडक/अर्जुनी, गोंदिया, दींनाक: 11 ऑगस्ट 2022 : मागील दोन दिवसंपासून सुरु असलेल्या सततधार पावसामुळे सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगांव तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदीला पूर येऊन पाणी गावात शिरलं आणि ग्रामस्थांच्या घराचा, शेतीचा मोठं नुकसान झालं; पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. याबाबत अनेकांच्या तकारी प्राप्त झाल्यास. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी बुधवार दिनांक १०/०८/२२ रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील डूग्गीपार, कनेरी, मनेरी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली अतिवृष्टीमुळे शेतीचे , परांचे व रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यामुळे लोकांना तात्काळ मदत मिळणेकरीता तलाठी , ग्रामसेवक व कृषि विभागाचे कर्मचारी यांना आदेश देवून तात्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तयार करून शासनास पाठविण्याचे आदेश देण्यात यावे व राज्य शासनानं लवकरात लवकर आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी तसेच पंचनामा करून त्यांना मदत करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. या संदर्भात आमदार मा. मनोहर चंद्रिकापुरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची सुद्धा भेट घेऊन प्रत्यक्ष अहवाल देऊन त्वरित मदत करण्यासाठी मुंबई येथे जाऊन भेट घेणार आहेत असे सांगितले.


 

Leave a Comment