गोंदिया, दिनांक: 10 ऑगस्ट 2022 : मागील महिनाभऱ्यापासून जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे, त्यातल्या त्यात काल पासून सुरु असलेल्या मुसळधार पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीतील पीके, घर व गोठ्याचे नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांचे संसार उघडे पडले आहे. त्याच प्रमाणे शेतकरी अडचणीत सापडला आहे, हि गंभीर व विदारक परिस्थिती सर्वश्रुत आहे, म्हणून अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना राज्य शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केली आहे. विशेष म्हणजे मागील दोन दिवसा पासून पडत असलेल्या पाऊसामुळे अनेक गावातील घरे पुराच्या वेड्यात सापडले आहे, या बाबीची दखल घेत पिडीत क्षेत्राची पाहणी सुद्धा केली.
गोंदिया जिल्ह्यात कालपासून पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली दरम्यान जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी अतिवृष्टी ची नोंद झाली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील सर्वच गावे पुराच्या पाण्याने प्रभावित झाली एवढेच नव्हे तर अनेक गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचीही परिस्थिती निर्माण झाली. सर्व नदी नाले दुधाळी वाहू लागली. परिणामी हजारो हेक्टर क्षेत्राखालील पीक पाण्याखाली सापडले. एकंदरीत गोंदिया जिल्हा शेतीतील पिकांसह अतिवृष्टी च्या विळख्यात सापडला. घर गोठे, व पिकांचे अतोनात नुकसान झाले अनेक कुटुंबांना उघड्यावर संसार करण्याची पाळी ओढवली आहे. एकंदरीत अडचणीत सापडलेल्या गोंदिया जिल्ह्याला तातडीने मदत करण्याची गरच आहे म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून नुकसानीचे सर्वेक्षण करून राज्य शासनाने नुकसान ग्रस्थांना त्वरित मदत करावी अशी मागणी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
तसेच नुकसानग्रस्तांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस राहणार अशी ग्वाही माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी दिली.