सडक अर्जुनी, गोंदिया, दींनाक : 08 ऑगस्ट 2022 : सडक अर्जुनी, खरीप हंगामाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी पेरणी व रोवणीचे कामाला सुरुवात केली. त्यातच जुलै महिन्यात पडलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांची रोपे पाण्याखाली आल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र प्रशासनाचे वतीने अजुनपर्यंत पंचनामे करण्यात आले नाही. त्यामुळे पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. करिता जिल्हा ओला दुष्काळ घोषित करा.
अशी मागणी सडक अर्जुनी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आली आहे. या बाबत निवेदन तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील नदी, नाले व तलावाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली व अनेक पुल वाहून गेले. ऐवढेच नव्हे तर शेत पीक पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
करीता जिल्हा ओला दुष्काळ घोषित करून ७५ हजार हेक्टर आर्थिक मदत द्या, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा, रब्बी धानाचे चुकारे त्वरीत देण्यात यावे, रब्बी-खरीप धानाला बोनस देण्यात यावे, खाद्य पदार्थांवरील जीएसटी रद्द करा, शैक्षणिक साहित्यावरील जीएसटी कमी करा, इंधनाचे दर कमी करा, अग्निपथ योजना रद्द करा, बेरोजगारांना रोजगार द्या. आदि मागण्यांचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. निवेदन देतेवेळी अर्जुन घरोटे, पुष्पा खोटेले, रामलाल शहारे,अंकित भेंडारकर, किशोर रोवे, रोशन बडोले, दिनेश हुकरे, सुधाकर कुर्वे, मनोज राऊत, कमलेश मुंगूलमारे, योगेश येळे, दामोधर नेवारे, अनिल राजगिरे, विस्मय बडोले, विकास कोरे, किरण हटवार, निना राऊत, योगेश बहेकार, धनवंता गभणे, पांडुरंग हटवार, शंकर मेंढे आदी उपस्थित होते.