आ. चंद्रिकापुरे यांच्या हस्ते ग्राम घोटी येथे रस्ता बांधकामांचे भूमिपूजन.


सडक/अर्जुनी, गोंदिया, दि. 08 ऑगस्ट :  तालुक्यातील ग्राम घोटी येथे 2515 अंतर्गत 10 लक्ष रुपये अंतर्गत निधीतून कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. जगो मेंढे यांचा घरा पासून ते यादवराव कटरे यांचा घरा पर्यंत सिमेंट काँक्रिट रोड कामांचे भूमिपूजन दिनांक 08 ऑगस्ट 2022 रोजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते करण्यात आले.

यात प्रामुख्याने रस्ता बांधकामांची गती वाढून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांना दिल्या.

याप्रसंगी पंचायत समिती उपसभापती शालिंदर कापगते , सरपंच दिनेश कोरे, विजय हेमणे, यशकुमार बोरकर, शोभा भालेकर, लता बावनकर, दुर्गा धुर्वे, प्रदीप ब्राम्हणकर, ओ. एन. कापगते, कुमार ब्राम्हणकर, अजय मुनेश्वर, राहुल अग्रवाल तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


 

Leave a Comment