वर्धापन दिना निमित्त सर्प मित्रांचा सत्कार सोहळा संपन्न.


सडक अर्जुनी, गोंदिया, दी. 07 : तालूक्यातील ग्राम सौंदड येथुन प्रसित होणारे जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रीय हिंदी, बहुभाषिक साप्ताहिक न्यूज पेपर रुद्रसागर च्या द्वितीय आणि महाराष्ट्र केसरी न्युज च्या चौथा वर्धापन दिना निमित्त कार्यक्रम दिनांक 06 ऑगस्ट 2022 रोज शनिवार ला कोहमारा येथील हॉटेल वैष्णवी येथे संपन्न झाला.

प्रसंगी वर्धापन दिन आणि संपादक बबलू मारवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील 6 सर्प मित्रांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी रुद्र सागर न्यूज पेपर चे विमोचन कार्यक्रम करण्यात आले. यावेळी सर्पमित्र हर्षद सेलोकर, पप्पी इंगळे, अनिरुद्ध पारधी, शुभम कडव, पराग लाडे, राज खोब्रागडे या सर्पमित्रांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्पमित्र अनिरुद्ध पारधी यांनी सापांविषयी माहिती देताना साप पकडताना येणाऱ्या अडचणी, सर्पमित्रांच्या मागण्या, सर्पदंश आणि त्यावर उपचार, अंधश्रद्धा यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच यावेळी तालुका मराठी पत्रकार संघाच्या सडक अर्जुनी तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी वेद परसोडकर यांची नियुक्ती करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

मंचावर प्रमुख पाहुणे स्थानी जि.प. सदस्य निशा तोडासे, पंचायत समिती सदस्या वर्षा शहारे, उपासभापती शालिंदर कापगते, सरपंच दिनेश हुकरे, संपादक डॉ. सुशील लाडे, वच्छलाबाई मारवाडे यांनी संपादक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत उपास्थिताना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमा प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रोशन बडोले, कृषी सहाय्यक राजशेखर राणे, चरणदाश शहारे, शुभम जनबंधू, रंजू भोई, रोशनी मारवाडे, उषाताई राऊत, जयपाल मारवाडे, आकाश बावनकुळे, हेमंत इरले, वेद परसोडकर, गंगाधर मारवाडे, संदीप कठाने, रोहित कठाने, कविता कठाने, वंदना मारवाडे, आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संचालन पत्रकार अश्लेष माडे यांनी केले. तर आभार आयोजक संपादक बबलू मारवाडे यांनी मानले. पत्रकारितेचा खडतर प्रवास बद्दल दिनेश हुकरे, सुशील लाडे, बबलु मारवाडे यांनी मंचावरून उपस्थितांना सांगितले दरम्यान छोटे खानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


 

Leave a Comment