तालुका कुणबी कृती समिती ची आढावा बैठक संपन्न.


सडक/अर्जुनी, गोंदिया, दिनांक: 07 : तालुक्यातील कुणबी समाजाचे अध्यक्ष अरुण डोये, उपाध्यक्ष माधवराव तरोने, सचिव अनिल मुनेस्वर यांच्या मार्गदर्शनात ऋतुजा कृषी केंद्र येथे तालुका कुणबी कृती समितीची आढावा बैठक तब्बल 2 वर्षे नंतर घेण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात सभा आयोजित करण्यात आल्या नसल्याने कार्यकारणीत नव्याने बदल करण्यात येणार आहे.

त्या मुळे आज तालुकाध्यक्ष अरुण डोये यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुणबी समाजाची संघटना मजबूत करणे, गाव तिथे संघटना हे धोरण घेऊन या विषयावर चर्चा करण्यात आली. समाजातील होतकरू विद्यार्थ्यांचे सत्कार करणे अश्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

सभेला उपस्थित तालुका अध्यक्ष अरुण डोये, उपाध्यक्ष माधव तरोने, सचिव अनिल मुनेश्वर, नगर पंचायतचे नगरसेवक देवचंद तरोने, अंकित भेंडारकर नगरसेवक सडक अर्जुनी, मधुसूदन दोनोडे, राजेश कटाने, किशोर शेंडे, दिनेश हूकरे ओबीसी तालुका अध्यक्ष, एकनाथ गायधने, बबलू मारवाडे संपादक/ पत्रकार, ईश्वर कोरे, रंजू भोई महिला तालुका अध्यक्ष, तालुकाध्यक्ष कुणबी समाज पुष्पाबाई खोटेले, प्रतिभा भेंडारकर, अंजली मुनेश्वर, अमोल मेंढे, राहुल कोरे, प्रल्हाद कोरे, स्वप्निल ब्राह्मणकर, डिके खोटेले, यशवंत डोये, ओमप्रकाश मुनेश्वर, कृष्णा ब्राह्मणकर, हरीश ब्राह्मणकर आदी उपस्थित होते. येत्या 21 ऑगस्ट रोजी पुन्हा सभेचे आयोजन करण्यात येणार असून तालुका कार्य कारनी नव्याने गठित होणार आहे.


 

Leave a Comment