सौंदड रेल्वे स्थानकावर रेल्वे खाली दबुन 60 वर्षीय प्रवाश्याचा मृत्यु


  • सदर ठिकाणी ही दुसरी घडली घटना, या पूर्वी नातीन आणि आजोबांचा झाला होता मृत्यू !

सडक/अर्जुनी, गोंदिया, दि. 05 ऑगस्ट 2022 : दररोज च्या अपघातात रोज शेकडो लोकांचा मृत्यू होतो. याला आपण आणि काही प्रमाणात प्रशासन देखील कारणीभूत असतो. अनेकवेळा मित्रांच्या मस्ती मुळे अपघात होतात. तर काही वेळा घाई घाईत वाहन पकडण्याच्या नादात देखील अपघात होतात.

तेवढच नाही तर काही वेळा प्रशासनाच्या देखील चुकी मुळे अपघात होतात. त्या मुळे आपण सावधगिरी बाळगून प्रवास केल्यास अपघाताला टाळू शकतो का हे देखील पाहणे गरजेचे आहे.

सौंदड रेल्वे स्थानकावर प्रशासनाने एका प्लॉट फार्म वरून दुसऱ्या प्लॉट फार्म वर जाण्यासाठी सुविधा उपलब्ध केली. आहे तरी देखील प्रवासी शॉर्ट कट मार्गाचा वापर करतात. या मुळे देखील मृत्युला आमंत्रण देण्या सारखे आहे.

प्रवाशी चक्क रेल्वे रुडावर उतरून प्रवास करीत असल्याचे देखील चित्र आहे. रेल्वे प्लॉट फॉर्म वर पाहिजे त्या प्रमाणात रात्रीला गाडी थांबल्यावर उजेड राहत नाही. त्या मुळे नागरिकांना अंधारात मार्ग शोधावा लागतोय. प्रशासनाच्या अश्या काही चुकांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात असते मात्र काही झाल्यास जबाबदारी सांभाळायला कुनी मोकळा राहत नाही.

आता इतकं सांगायचं अश्या साठी तर त्याचे झाले असे की 05 आगस्ट 2022 रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड येथील रेल्वे स्थानकावर अंदाजे 60 वर्षीय नागरिकांचा रेल्वे खाली दबून मृत्यु झाला.

रिटायर शिक्षक भोजराज लक्ष्मण गहाने अंदाजे वय वर्ष 60 मुक्काम फुटाळा असे पोलिसांनी सांगितले. आज दुपारी 12 वाजता सौंदड रेल्वे स्थानकावर बल्हारशा वरून गोंदिया कडे जाणारी मेमो रेल्वे गाडी क्रमांक : 08803 असे असून मृतक भोजराज लक्ष्मण गहाने हे गाडी सुटण्याच्या वेळेवर रेल्वे प्लॉट क्रमांक : 01 वर बाहेरून तिकीट न घेता धावत धावत आले.

येवढ्यात त्यांनी गाडीच्या दाराजवळ असलेल्या रॉड ला हात धरले. आणि कुणी तरी आवाज दिला म्हणून मागे वळून पाहिलं तेवढ्यात त्यांचा पाय घसरला आणि ते रेल्वे खाली गेले हा सर्व प्रकार अनेक प्रवाश्यानी पाहिला. ते फरफटत लांब पर्यंत गेले. त्यांची पेन आणि चप्पल घटना स्थळी दिसून आली. उपस्थित लोकांनी त्यांना बाहेर काढले.

यावेळी त्यांचा मुलगा देखील घटना स्थळी उपस्थित होता. त्यांना तो रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी आला होता. दरम्यान असे काही प्रवाशी सांगत होते. हा सर्व प्रकार अनेकांनी पाहिला.

पोलिसांना अधिक माहिती विचारली असता. मृतक यांनी तिकीट न काढता रेल्वेत प्रवास केल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास अल्याच त्यांनी सांगितले. मात्र पोस्ट मोर्टम रिपोर्ट तपास दरम्यान त्यांच्या कडे तिकीट होती की नाही ते कळेल. असे विजय भालेकर सब इन्स्पेक्टर आर.पी. एफ. चौकी वडसा यांनी घटनास्थळी भेटी दरम्यान सांगितले.

जखमीला तात्काळ साकोली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात एक हात तुटला मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाल्याचे दिसत होते. दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना कळले. सदर घटनेचा तपास जी.आर.पी. पोलिस गोंदिया करनार असून साकोली पोलिसात सदर घटनेची जिरो रिपोर्ट करण्यात आली आहे.


 

Leave a Comment