सडक अर्जुनी, गोंदिया, दि. 04ऑगस्ट 2022 : जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष गोंदिया यांच्या मार्गदर्शना खाली तालुका अभियान व्यवस्थापन सडक अर्जुनी येथे आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत हर घर तिरंगा हे उपक्रम तालुक्यामध्ये यशस्वी पने राबविण्याकरिता तसेच प्रत्येक कुटुंबापर्यंत आपले राष्ट्रध्वज पोहोचविन्याकरिता उमेद अभियानाच्या माध्यमातून याची सुरुवात करण्यात आलेली आहे .
त्याचाच एक भाग म्हणुन आज दिनांक 03 ऑगस्ट 2022 रोजी सडक अर्जुनी येथे श्रीकांत वाघाये, ( गटविकास अधिकारी ) पंचायत समिती सडक अर्जुनी, शालिंदर ( उपसभापती ) पंचायत समिती सडक अर्जुनी यांच्या शुभ हस्ते हर घर तिरंगा या कार्याचे ग्रामसंघाला तालुक्यावर झेंडे वाटपाच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
तालुक्यातील हर घर तिरंगा उपक्रमाची यशस्वी अमलबजावणी करण्याबाबत तसेच राष्ट्रध्वज प्रत्येक घरांमध्ये व्यवस्थित वेळेत पोहोचविणे करिता नियोजन बाबत सूचना देण्यात आले. या प्रसंगी अंजू मॅडम BMM, श्वेता मॅडम CC, लीभाश सर CC, गुप्ता मॅडम CFM, CLM, CAM व समुहातील महीला तसेच कॅडर उपस्थित होते.