- पळसगाव ते सौंदळ मार्गावरील आजचे चित्र…
सडक/अर्जुनी, गोंदिया, ( बबलू मारवाडे ) दि. 04 ऑगस्ट 2022 तालुक्यातील ग्राम सौंदड ते पळसगाव या 2 किमी मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे. हे चित्र गेली 75 वर्षे पासून आहे. स्वातंत्र्याचे 75 वे अमृत महोत्सव आणि ग्रामीण भागातील मार्गांचा आजही विकास रखडला असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील सर्वात मोठे गाव सौंदड मानले जाते. अश्यात बुधवार आठवडी बाजार करण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने येते येतात. पळसगाव, भदुटोला, येथील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी देखील याच मार्गाचा वापर करतात.
सौंदड येथील काही शेतकऱ्यांची शेती नदीच्या दुसऱ्या बाजूला आहे. म्हणजे पळसगाव हद्दीत आहे. त्या मुळे पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी तब्बल 4 ते 5 किमी अंतर लांबून प्रवास करावा लागतोय हे वास्तव्य आहे.
येवढेच नाही तर कोल्हापुरी बंधार्यात उन्हाळ्यात पाणी साठविले जाते. त्या वेळी देखील शेतकऱ्यांना तब्बल 4 ते 5 किमी अंतर लांबून आपल्या शेतात जाण्यासाठी पायपीट करावी लागत असते.
भात पेरणी आणि कापणी म्हणजे उन्हाळी आणि पावसाळी या दोन्ही हंगामा मध्ये शेतकऱ्यांना तब्बल 4 ते 5 किमी अंतर म्हणजे राका मार्गाने लांबून जावे लागते.
ग्राम पळसगाव येथील शालेय विद्यार्थी देखील सौंदड गावात शिक्षण घेण्यासाठी किंवा ट्युशन घेण्यासाठी रोज येतात. शेतकरी औषधी घेण्यासाठी येतात. अश्या असंख्य कामासाठी नागरिकांची रोज सौंदड गावात ये जा असते. मात्र त्यांना लांबून प्रवास करावा लागतोय हे सत्य आहे. ग्रामीण भागातील गावांना जोडण्यासाठी तालुक्यात सर्वत्र रस्ते निर्माण करण्यात आले आहेत. मात्र लांबचा प्रवास कमी व्हावा अशी मागणी आहे. हा प्रवास कमी करण्यासाठी चुलबंद नदीच्या पात्रात पुलाची निर्मिती आणि मजबूत रस्त्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. काही वेळा शेतकरी कंबर भर पाण्यातून देखील प्रवास करतात. हा जीवघेणा मार्ग ठरू शकतोय.