सडक/अर्जुनी, गोंदिया, दि. 04 ऑगस्ट 2022 : तालुक्यातील ग्राम फुटाळा ते सौंदड बायपास मार्गाची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र गेली 10 वर्षे पासून दिसत आहे. या मार्गावर मोठे जीवघेणे खड्डे निर्माण झालेले आहेत. अश्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्या मुळे या मार्गाची दुरुस्ती ची मागणी होत आहे. गेली दहा वर्षाचा कालावधी लोटला असला तरी देखील या मार्गाची नविनिकरण करण्यात आलेली नाही.
हा बायपास मार्ग अत्यंत महत्वाचा असून या मार्गाने शेतकरी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक करते.
पाच वर्षे पूर्वी या मार्गाची नविनी करण करण्यासाठी येथे मटेरियल टाकण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव सदर काम झाले नाही. पुन्हा या मार्गावर आमदार निधीतून मुरूम टाकण्यात आले होते. मात्र थातुर मातुर मुरूम टाकून पाच लक्ष रुपये चे बिले काढण्यात आल्याची देखील चर्चा होती. या मार्गाचे नव्याने पक्का बांधकाम करण्यात यावा अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
फुटाळा ते सौंदड हा मार्ग जवळपास एक किमी अंतर आहे. हा मार्ग फुटाळा ते सौंदड असा असून थेट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर निघते. अनेकवेळा रेल्वे क्रॉसिंग वरील गेट बंद असल्याने वाहतूक बंद असते त्या मुळे फुटाळा ते सौंदड मार्गाचा बायपास मार्ग म्हणून देखील वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्या मुळे अत्यंत महत्वाचा मानल्या जाणाऱ्या मार्गाची दयनीय अवस्था झाली असून दुरुस्तीची मागणी होत आहे.