प्रतिनिधी / सालेकसा, दिनांक 12 – गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूका जाहीर झाल्या असून त्यासाठी आवश्यक आरक्षणाची सोडत आज करण्यात आली. सालेकसा तालुका अंतर्गत येणाऱ्या ८ पंचायत समितीची क्षेत्राची सोडत आज तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी शिरसाट, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये एका छोट्या मुलीच्या हातून आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढत पंचायत समिती निहाय आरक्षणाची सोडत करण्यात आली.
सालेकसा तालुक्यात झालिया सोनपुरी, पिपरिया, टोयागोंदी, तीरखेडी, कावराबांध, कारुटोला, लोहारा इत्यादी पंचायत समिती क्षेत्राचा समावेश आहे. यासाठी अनुसूचित जाती महिला करिता झालीया पंचायत समिती क्षेत्र, अनुसूचित जमाती महिला करिता टोयागोंदी, सर्वसाधारण महिला तिरखेडी व लोहारा, तर अनुसूचित जमाती करिता कावराबांध व नामाप्र करिता कारूटोला राखीव करण्यात आले असून सोनपुरी आणि पिपरिया या जागा सर्वसाधारण करिता खुल्या सोडण्यात आले आहेत.
यावेळी तहसीलदार शरद कांबळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वासुदेव चूटे, मनसे तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष कुलतारसिंह भाटिया, कॉंग्रेस तालुका सचिव ओमप्रकाश ठाकरे, गोंदिया जिल्हा युवा काँग्रेस महासचिव ओमप्रकाश लिल्हारे, सालेकसा तालुका युवक काँग्रेस महासचिव जितेंद्र बल्हारे, मनसेचे शहर उपाध्यक्ष गोल्डी भाटिया, युवा काँग्रेस शहर अध्यक्ष लाला शिवणकर, एच टी न्युज चे प्रतिनिधी डालेश मोहारे इत्यादी मंडळी सोबतच सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार मंडळी उपस्थित होते.