सडक अर्जुनी, दिनांक 12 नोव्हेंबर 2021 – आज आदिवासी विविध सहकारी संस्थेच्या डव्वा येथिल शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांचे उद्घाटन आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांच्या हस्ते संपन्न झाले. आमदार यांच्यासह संचालक मंडळ व शेतकरी वर्ग यांच्या कडुन केंद्रावरील वजनांचे पुजन करुन धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले.
परिसरातील शेतकर्यांनी शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर धान द्यावे असे आवाहन आमदारांनी केले. खरीप हंगाम २०२१-२२ मधील धान खरेदी केंद्र त्वरीत सुरू करण्यात येईल व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप धानाची विक्री करण्यास कोणतीही अडचण होवू नये तसेच व्यापाऱ्यांना कमी भावात धान विकावा लागु नये यासाठी खा.पटेल व आमदार चंद्रिकापूरे हे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यास प्रयत्नशील होते.
उद्घाटन प्रसंगी डॉ. अविनाश काशिवार तालुका अध्यक्ष राकॉपा, भरतसिंग दुधनांग (आ. वि.म.सचालक), गणेश साळवे ( उ.प्रा.व्य.नवेगांव/बांध) आनंदराव जोशी (अध्यक्ष आ.वि.कार्य. सह.संस्था डव्वा) पुष्पमाला बडोले सरपंच डव्वा, एफ. आर. टी. शहा (माजी कृषि मंडळ अधिकारी) अनिल बिलीया, रूपविलास कुरसुंगे, सुनंदाबाई उन्दिरवाड़े (सरपंच गोपालटोली) भूमेश्वर पटले सरपंच (पळसगांव) उमराव चौधरी, अनिल हरड़े, वासुदेव देशमुख, रामलाल सयाम, कुवरलाल कुरसुंगे, प्रधानबाई , सहित मोठ्या संख्येने शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.