गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 12 नोव्हेंबर 2021 – सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, येथे दि. १४ रोज सकाळी १०.०० ते ३.०० ह्या कालावधीत तालुका सत्र न्यायालय सडक अर्जुनी अंतर्गत भव्य महाशिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
या महाशिबीरामध्ये खालील योजनांचा लाभ एकाच छत्राखाली सर्व उपस्थित लाभार्थ्यांना देण्यात येईल. तरी सर्व प्रभाग समन्वयक/ व्यवस्थापक/ आयसीआरपी / सर्व सखी/ लेखापाल समूहातील जास्तीत जास्त लाभ मिळविण्यासाठी व या महाशिबिरात उपस्थित राहून लाभ घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
१ ) आधार नोंदणी व दुरुस्ती.
२ ) तहसील कार्यालयामार्फत मिळणाऱ्या सर्व योजना.
३ ) आदिवासी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सर्व योजना
४ ) शेतीसाठी व घरघुती वापरासाठी विज कन्नेक्शन
५ ) कोविड 19- लसीकरण
६ ) बिपी., शुगर, ऐचबी., डोळे तपासणी ( निशुल्क)
७ ) पशु व जनावरांना लसीकरण
८ ) नविन जनधन व अन्य बँक खाते उघडणे.
९ पंचायत समितीच्या अंतर्गत सर्व योजना.
१० ) वन विभागाच्या अंतर्गत सर्व योजना
११ ) भुमी अभिलेख कार्यालयातील सर्व योजना
१२ ) महीला व बालकल्याण विभागातील सर्व योजना ( बेबी कीटचे वाटप )
तसेच विविध समुहातील महीलांना त्यांचे हक्क व कायदेविषयक बाबींवर मा. न्यायाधीशांचे मार्गदर्शन मिळणार आहे. महा शिबीरामध्ये समुहांनी तयार केलेल्या वस्तुंची विक्री व प्रदर्शनी सुद्धा आपल्याला लावता येणार आहे. महाशिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.