गोंदिया, दिनांक – 12 नोव्हेंबर 2021 – आज गिधाडी (गोरेगाव) येथे श्री साई सहकारी संस्था द्वारा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. श्री जैन यांच्यासह संचालक मंडळ व शेतकरी वर्ग यांच्या कडुन केंद्रावरील वजनांचे पुजन करुन धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. परिसरातील शेतकर्यांनी शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर धान द्यावे असे आवाहन श्री जैन यांनी केले.
खरीप हंगाम २०२१-२२ मधील धान खरेदी केंद्र त्वरीत सुरू करण्यात येईल व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप धानाची विक्री करण्यास कोणतीही अडचण होवू नये तसेच व्यापाऱ्यांना कमी भावात धान विकावा लागु नये यासाठी श्री पटेल हे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यास प्रयत्नशील होते. खरीप हंगामातील धान खरेदी त्वरीत सुरु करण्यासाठी ते सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात होते या करिता राज्याच्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन धान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
श्री पटेल यांच्या प्रयत्नामुळे धान खरेदी सुरू झाल्याने शेतकर्यांनी प्रफुल पटेल यांचे आभार मानले. उद्घाटन प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, केवल बघेले, श्रीमती पुष्पाताई जयतवार, बाबा बहेकार, यु टि बिसेन, कृष्णकुमार बिसेन, सदाशिव कटरे, नेतराम पारधी, हेमराज मेंढे, मनु भाऊ मेंढे, पुरुषोत्तम बहेकार, श्रीमती माया चौधरी, श्रीमती अहिल्याबाई भगत, धुर्वेश कटरे, प्रेमलाल शेंडे, धनराज जयतवार, हुमेश बिसेन, नरेंद्र जयतवार, पुरुषोत्तम उरकुडे, राजु चौधरी, योगेश चौधरी, महादेव भगत, आत्माराम ठाकरे, भरतराम भगत, देवेंद्र पटले, नरेंद्र पटले, पुष्पराज पटले सहित मोठ्या संख्येने शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.