गोरेगाव, गोंदिया, दिनांक ११ – आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते ग्राम गराडा येथे दिनांक १० रोजी आमदार स्थानिक निधी अंतर्गत खालील प्रमाणे विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामध्ये १) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गराडा ते श्रीराम भोंडे यांच्या घराकडे जाणारा सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे बांधकाम तसेच २) रामदास राऊत ते नरेश काठेवार यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम व सिमेंट काँक्रीट रोड बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रम पार पाडण्यात आले. याप्रसंगी मा.लक्ष्मणराव चंद्रिकापुरे जेष्ठ नेते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, ससेंद्रकुमार भगत सरपंच ग्रामपंचायत मुरदोली, अलकाताई काठेवार, माजी पंचायत समिती सदस्य, सुरेंद्र भोंडे अध्यक्ष वन व्यवस्थापन समिती गराडा, वसंत मडकाम, विनायक रोटसरे, नरेश काठेवार, रामदास राऊत, भोटेश्वर टेकाम, गणेश भिमटे, रामसिंग मसराम, तेजरामजी राऊत, पुष्पाबाई टेकाम, उत्तम काटेवार, ताराबाई खंडवाये, सीताबाई बोरसारे, उर्मिला राऊत, उषाबाई काटेवार, प्रमिला मसराम, जयवंताबाई नेवारे व मान्यवर गावकरी उपस्थित होते.