अर्जुनी-मोर, गोंदिया, दिनांक 11 ( संतोष रोकडे ) – अर्जुनी-मोर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाराभाटी गावात आरोपी लोकेश मुनेश्वर आंदे वय 21 वर्ष राहणार बाराभाटी तालुका अर्जुनी-मोर जिल्हा गोंदिया यांचेवर भांद वि कलम 354 (ड);376 :सहकलम 4:8:12 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून दिनांक 09 नोव्हेंबरला जिल्हा सत्र न्यायालय गोंदिया येथे हजर करण्यात आले, जिल्हा सत्र न्यायालय गोंदिया यांनी आरोपी लोकेश याला दिनांक 12 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठळी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की बाराभाटी येथील फिर्यादीने दिलेल्या जबाबानुसार आरोपी हा नेहमीच माझ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होता , अशी माहिती दिली असून तो दिनांक 21 ऑगस्ट 2021 च्या सकाळी दहा वाजेदरम्यान आरोपी लोकेश याने आपल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून ब्राह्मण टोला जवळील नर्सरी कडे नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थ्तापीत केल्याने ती गर्भवती झाल्याबाबत फिर्यादीच्या जबाबावरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करून करण्यात आला आहे.
त्या अनुशंगाने आरोपीला दिनांक 08 नोव्हेंबरला अटक करून दिनांक 09 नोव्हेंबर ला गोंदियातील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले, पुढील तपास अर्जुनी-मोर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी पोलीस नाईक विजय कोटांगले करीत आहेत.