डॉक्टर सिद्धांत यांचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते सत्कार


गोंदिया, अर्जुनी-मोर, ( संतोष रोकडे ) – गोंदिया जिल्ह्यातील शेवटचा टोकावरील आदिवासीबहुल व दुर्गम तालुका म्हणून अर्जुनी-मोर तालुक्याची शासन दरबारी नोंद आहे तरीही या मागासलेल्या अर्जुनी-मोर तालुक्यातील माहूरकुडा या छोट्याश्या गावातील प्राथमिक शिक्षक फुलचंद शाहरे यांचा मुलगा सिद्धार्थ हा गोंदिया येथील के टी एस हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून रुजू होऊन रुग्णसेवा देत आहे डॉक्टर सिद्धांत यांचे शिक्षण एम बी बी एस एम एस शिक्षण पूर्ण करून यांची नियुक्ती मुंबई येथे झाली होती.

परंतु स्वतःच्या जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला रुग्णांना सेवा देण्यासाठी गोंदियातील के टीएस रुग्णालय येथे रुजू झाले त्यांच्या या कार्याबद्दल दिनांक 8 नोव्हेंबर रोजी हॉटेल मोरया येथे अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच विधानमंडळ समिती अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर सिद्धांत यांचा पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, डॉक्टर सिद्धांत स्वजिल्ह्यातील रुग्णांना त्यांच्या शुभेच्छा गौरव केला आहे सेवा देणार असल्याने जिल्ह्यातील अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


 

Leave a Comment