गोंदिया, दिनांक ११ – खोडशिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच्या भव्य पटांगणात रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे उदघाटन १० रोजी संपन्न झाले, कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीड़ा मंडळ तर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले , उपस्थित पाहुण्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी जी. प. सदस्य गंगाधर परशुरामकर, माजी जी. प. सदस्य रमेश चुर्हे, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव डॉ. रुखीराम वाढई, मनोहर परशुरामकर, प्रभाताई परशुरामकर, शुभांगी वाढवे सामाजिक कार्यकर्ता, राहुल यावलकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीड़ा मंडळाचे सदस्य व गवकारी उपस्थित होते.