माझ्या क्षेत्रातील जनता हेच माझे सर्वस्व – आ.मनोहर चंद्रीकापुरे


अर्जुनी मोर, गोंदिया, दिनांक – १० – दिवाळी च्या शुभ मुहूर्तावर अर्जुनी मोर येथील मोरया होटेल येथे आज दि ८ रोजी आमदार मनोहरराव चंद्रीकापुरे यांच्या तर्फे स्नेह मिलन समारोह चे आयोजन करण्यात आले, त्यावेळी प्रमुख्यानें माजी आमदार राजेंद्र जैन, नरेश माहेश्वरी, गंगाधर परशुरामकर माजी जि. प सदस्य, देवेंद्र चौबे, किशोर तरोणे माजी जि. प सदस्य, सर्वेष भुतडा,लोकपाल गहाने ,दादा फुंडे, प्रमोद लांजेवार, रतिराम राणे माजी जि. प सदस्य, लक्ष्मण चंद्रिकापुरे, बंडूभाऊ भेंडारकर, नामदेव डोंगरवार, दुलाराम चंद्रिकापुरे यशवंत परशुरामकर, यशवंत गनवीर, अशोक चांडक, उपस्थीत होते. त्यावेळी कमी वेळात उपस्थीत नागरिकांना राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन करुन नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण केले तसेच त्यांनी सांगीतले की जोपर्यंत मनोहर राव आपल्या क्षेत्रात कार्यरत आहेत तोपर्यंत सर्व शेतक-यांना तसेच मजुर वर्गांना कोणतीही कमी भासू देणार नाही.

त्यानंतर आपल्या प्रस्तावनेत आमदार चंद्रीकापुरे यांनी जनतेला सांगीतले की माझ्या क्षेत्रातील जनता हिच माझे सर्वस्व असुन त्यांच्यासाठी मी नेहमी कार्यास तत्पर आहे. तसेच शेतक-याना ज्या काही समस्या आहेत त्यामध्ये धानाच्या बोनस बद्धल असो किंवा धान पिकावर यावर्षी झालेल्या रोगराई मधून झालेल्या नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न मी नक्किच करणार यसेच आता माझ्याकडे विधानमंडळ नरेगा चे अध्यक्ष पद आहे.

मी माझ्या मजुर जनतेला कामे देण्याचा काम पूर्णत्वास आणणार असे प्रत्येक गावातील ग्रामपंचायत मध्ये महीती दिलेली आहे, असे प्रतिपादन आज 09 रोजी झालेल्या स्नेह मिलन समारोह मध्ये उपस्थीत जनतेसमोर केले. कार्यक्रमाला मनोरंजन म्हणून संगीतमय कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आणि स्वत: आमदार यांनी आपल्या सुमधूर आवाजात गीत गाऊन उपस्थीत जनतेला एक वेगळाच मनोरंजन प्राप्त करुन दिला त्यावेळी उपस्थीत जनतेनी सुद्धा गीत गाऊन आपले मन मोकळे केले त्यामध्ये,डॉ सुगत चंद्रीकापुरे, अविकुमार मेश्राम, अस्तिक मेश्राम, निशाताई मस्के, एफ आर टी शाह, यांनी गीत गायन केले. कार्यक्रमाचे शेवट हे अल्पोहाराने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्त्यंनी सहकार्य केले.


 

Leave a Comment