तालुका विधी सेवा समिति द्वारा, कायदेविषयक जनजागृति कार्यक्रम संपन्न.


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 09 नोव्हेंबर – येथील तहसील सभागृहात कायदेविषयक जनजागृति कार्यक्रमाचे आयोजन तालुका विधी सेवा समिति द्वारा करन्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए एस एस औटी यांचे हस्ते झाले। या प्रसंगी जिल्हाविधी सेवा समिति अध्यक्ष न्यायाधीश दुधे, दिवानी न्यायाधीश विक्रम आव्हाड, तालुका वकिल संघाचे अध्यक्ष राजेंद्र लंजे, तहसीलदार गावड, खंडविकास अधिकारी वाघाये, पोलीस पाटील संघाचे राज्यकार्याध्यक्ष भृंगराज परसुरामकर, जिल्हाअध्यक्ष दिलीप मेश्राम, सरपंच गायत्री ईरले, सरपंच वंदना थोटे, तालुक्यातील पोलीस पाटील व विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांनी न्यायाधीश ए एस एस आर औटी म्हनाले कायद्यानी सर्व नागरिकांना समान अधिकार दिलेले आहेत, परंतु याची जानीव जागृती होने आवश्यक आहे, अन्यथा कायद्याच्या अज्ञानापोटी अनेक घटक आपल्या अधिकारा पासुन वंचीत राहतात, त्यामुळे ग्रामीण स्तरावर पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची फार मोठी जबाबदारी आहे। त्यांनी जर जनतेचे मार्गदर्शक म्हणून कार्य केले तर गांव तंटामुक्त होन्यास मदत होईल व आपन स्वाभीमानाने हे गांव तंटामुक्त गांव आहे असे फलक लाऊ शकतो कारण शांततेतून समृद्धि कडे जान्याचा हा एक मार्ग आहे।

आपला भारतदेश कुटुंबवत्सल देश आहे, त्यामुळे कुटुंबाचे अधिकार व कर्तव्य या विषयी कायद्यात तरतुद आहे, असे असतांनी सुध्दा बहीन-भाऊ यांचे हिस्सेदारीचे खटले अनेक वर्षे न्यायालयात चालत असतात हि शोभनिय गोष्ट नाही, म्हणून आपन सर्वांनी मिळुन निरंतर कायद्याचा प्रसार , प्रचार, मार्गदर्शन व मदत करुन जनतेची सेवा करावी असे आव्हाहन केले, या प्रसंगी भृंगराज परसुरामकर व गायत्री ईरले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी संचालन ओ एस गहाने यांनी तर आभार अड राजेन्द्र लंजे यांनी मानले कार्यक्रमाला तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संखेनी ऊपस्थीत होते।


 

Leave a Comment