- दिव्यांग जणांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र तालुकास्थळी द्यावे याबद्दल.
गोंदिया, दिनांक – 09 : दिव्यांग व्यक्तिंना कोणत्याही शासकीय लाभाकरिता आवश्यक असलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनविन्याकरिता लाभार्थ्यांना जिल्हा आरोग्य कार्यालया पर्यंत प्रवास करावा लागतो. दिव्यांग व्यक्ति शारीरिक दृष्ट्या सक्षम नसल्याने जिल्ह्यातील दुर्गम भागातुन त्याला प्रवास करुण जिल्हास्थानी येणे खूपच कठीन बाब आहे.
करिता तालुका स्तरावर सदर प्रमाणपत्र तयार झाल्यास दिव्यांग जणांना मदत होईल, करिता आज दिनांक 08 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्याच्या प्रवासावर आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री मा.ना.डॉ.भारतीताई पवार व खासदार सुनील मेंढे यांना जिल्हा भाजयुमो ने संबंधित निवेदन प्रेषित केले. सदर मागण्यांचे तात्काळ संज्ञान घेत मंत्री महोदया यांनी जिल्हा आयोग्य विभाग व जिल्हाधिकारी यांना जागिच सूचना दिल्या व लवकरात लवकर सबब सेवा उपलब्ध करवून देण्याचे निर्देश दिले.
तालुका स्तरावर आरोग्य विभागामार्फत प्रत्येक आठवड्यात दिव्यांग जनांची नोंदणी करुण त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र तालुकास्थळी देन्यात यावे, तसेच दिव्यांग व्यक्तिंना विविध लाभाच्या योजना संबंधित मार्गदर्शन विभागाकडून वेळोवेळी करण्यात याव्यात याप्रकारे विविध ठळक मागण्यांचे निवेदन भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा महामंत्री हर्ष मोदी, कुणाल बिसेन, मिलिंद शेवाळे, तिजेश गौतम, पारस पुरोहित, बाला वाहिले, पलास लालवानी, जागेश नागपूरे, प्रवीण पटले व इतर युवा मोर्चा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देन्यात आले.