- राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व खासदार प्रफुल पटेल यांच्या वडसा येथिल आगमनाची जय्यत तैयारी.
गोंदिया, दिनांक – 09 नोव्हेंबर 2021 – सिंधू सभागृह वडसा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार व खासदार प्रफुल पटेल यांच्या वडसा येथिल आगमनाची पूर्व तयारी व नियोजन सभा माजी आमदार राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार व खासदार प्रफुल पटेल दि 18 नोव्हेंबर 2021 बुधवार ला गडचिरोली जिल्ह्यातील वडसा/देसाईगंज येथे पक्ष मेळाव्याला उपस्थित राहणार असून त्या निमित्ताने पक्षाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या वेळी करण्यात आले. या सभेला माजी आमदार राजेंद्रजी जैन, अध्यक्ष बिडीसीसी सुनिलभाऊ फुंडे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, निरिक्षक श्रीकांत शिवणकर, जगदीश पंचबुद्धे, वसंतराव ठाकरे, युनूस शेख, गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे, नानाभाऊ नाकाडे, बालूभाऊ चुंने, कृपाल मेश्राम, शरद सोनकुसरे, संदीप ठाकुर, अमिनभाई लालाणी, लतिफ शेख, राकेश राऊत, सौ वणामाला पुस्तोडे, दृपदी सुखदेवे, पुष्पा सुरकर, राम लांजेवार, संजय साळवे, प्रदीप हजारे, सुनील नंदनवार, प्रल्हाद वघारे, पठाण सर, अंबादास कांबळी, मनोज ढोरे, योगेश नांडगाये, हेमू परशुरामकर, कृष्णा आंबेकर, अविनाश हुमने, कपिल बागडे, सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.