सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दिनांक : १३ जुलै २०२३ : कोल्हापुरी बंधाऱ्यावर लोखंडी कठड्याच्या ठिकाणी बांबूचे कठडे तालुका प्रशासनाचा प्रताप, या शीर्षका खाली दि. 11 जुलै रोजी महाराष्ट्र केशरी न्यूज ने एक बातमी प्रकाशित केली त्या बातमीची दखल आता जिल्हाधिकारी यांनी घेतली आहे. गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले आहे की, प्राप्त माहिती नुसार ज्या पुलावर लोखंडी पाईप च्या ठिकाणी बांबूचे कठडे लावण्यात आले आहे. त्या ठिकाणी आता लोखंडी पाईप चे कठडे बसवण्यात येणार. या बाबाद बांधकाम विभागाच्या अधिकार्यांशी ते बोलनार आणि तसे निर्देश ही त्यांनी देणार आहेत. त्या मुळे आता लवकरच बांधकाम विभाग या ठिकाणी लोखंडी कठडे बसवणार आहे. जनतेच्या जीवाची प्रशासनाला काळजी आहे. असे यावरून लक्ष्यात येते.
११ जुलै रोजी प्रकाशित झालेल्या बातमीत नेमक काय मजकूर होते. आपण पाहू या. गोंदिया जिल्हयाच्या सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम सौंदड ते राका मार्गावर चुलबंध नदी आहे. या नदीवर बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली होती. या बंधाऱ्याच्या पुलावरून नागरिकांचा मोठ्या संख्येने ये जा असते अश्यात. तीन वर्षे पूर्वी नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण लोखंडी पाईप ची रेलिंग वाहून गेली. अश्यात वारंवार बातम्या प्रकाशित होत अश्यल्याने तालुका प्रशासनाने या पुलावर बांबूची रेलिंग तय्यार केली आहे.
सिमेंट पिशवी मध्ये वाळू भरून त्यावर बांबू खोचले आहे. अश्यात कुणी हात लावल्यास पडण्याची भीती आहे. या बांबूना कुठलाही आधार नाही. या ठिकाणी एक वर्ष पूर्वी एका बेलबंडी धारकाची बंडी पुलावरून खाली पडली होती. तर या पूर्वी या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. राका, पळसगाव, चिखली, कोकना, कणेरी, मनेरी, सह अनेक गावातील नागरिक या मार्गाचा वापर करतात. तर साकोली वरून नवेगाव बांध कडे जाणारे बहुतांश प्रवाशी व अवजड वाहने याच मार्गाचा वापर करतात. अश्यात पुलाला कठडे नसल्याने पुलावरून जाताना वाहन धारकाचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्राम राका येथील उपसरपंच मधूसुधन दोनोडे यांनी सांगितले की अनेक दिवसा पासून या पुलाला कठड्यांची मागणी आहे. मात्र तालुका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. या ठीकानावर अपघात क्षेत्र तय्यार झाले आहे. रोज शेकडो नागरिक या ठिकाणावरून प्रवास करतात. तर सुधीर शिवणकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सदर बांबूचे कठडे पाठबंधारे विभाच्या वतीने लावण्यात आले. तर काही प्रतेक्ष दर्षी लोकांनी सांगितले की काही बांधकाम विभागाचे कर्मचारी या ठिकाणी मोजमाप करीत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अधिकारी संचित शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
तर पाठबंधारे विभागाचे अधिकारी आपण ते कठडे लावले नाही. असे सांगत आहेत. त्या मुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. आता या बातमीची दखल खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे लवकरच या ठिकाणी लोखंडी कठडे लागणार आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील इलेक्ट्रोनिक मिडीयाच्या सर्वच प्रतीनिधिनी या बातमीची दखल घेतली होती.